मुंबई : स्वप्नील लोणकर या MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर राज्यात MPSC विद्यार्थ्यांच्या परीक्षा, मुलखाती आणि नियुक्त्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर सदस्यांची नेमणूक ३१ जुलैपूर्वी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार फाईलही राज्यपालांकडे पाठवली होती, पण त्यावर राज्यपालांची सही होत नसल्याने या नियुक्त्या रखडल्या आहेत.
विद्यार्थांना दिलासा: रखडलेली MPSC ची परीक्षा ४ सप्टेंबरला; आयोगाकडून परिपत्रक जाहीर
या पार्श्वभूमीवर आता, ठाकरे सरकारमधील सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज संध्याकाळी भेट घेणार असून, MPSC सदस्य नियुक्तीची फाईल, राज्यपालांनी तात्काळ मंजूर करावी, अशी मागणीवजा विनंती ते राज्य सरकारच्याकडून राज्यपालांना करणार आहेत. दरम्यान, राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातली जखम आता पुन्हा उघडी पडल्याने, या भेटीतनंतर यातून काय निष्पन्न होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
MPSC भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पाडण्याची गरज आहे. राज्यात २१९२ पदांसाठी एकूण ६९९८ उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत. त्यासाठी MPSC ला या ज्यादा सदस्यांची गरज आहे. या मुलाखत घेणाऱ्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे, मात्र राजभवनाकडून ही फाईल २ ऑगस्टला मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे, राज्य सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करावी, अशी विनंती राज्यपालांना करणार आहे. @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks @NCPspeaks २/२
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) August 4, 2021
Read Also :
- मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या रहस्याचा अखेर उलगडा करण्यात NIA ला यश
- महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर. ; संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा
- अमित शहा-पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- भाजप-राष्ट्रवादी एकत्र येतील यात शंका नाही, अंजली दमानिया म्हणतात….
- ‘ठाकरे सरकारचं पॅकेज घोषित होत पण पोहोचत नाही’, भाजप नेत्यांची खोचक टीका