मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी परीक्षा ९ एप्रिल रोजी राज्य शासनाने पुढे ढकलली होती. आता ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. याबाबत परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे.
हे पण वाचा: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन काम करा – नाना पटोले
MPSC’तर्फे २०१९ मध्ये संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये घेतली जाणारी परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून सर्व विद्यार्थी परीक्षा केव्हा होणार या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे महेश धरबुडे यांनी केली होती.
हे पण वाचा: ‘ठाकरे सरकारचं पॅकेज घोषित होत पण पोहोचत नाही’, भाजप नेत्यांची खोचक टीका
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी परीक्षा प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यावर राज्यभरातून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. हा असंतोष शांत करण्यासाठी सरकारने पुढे येत रखडलेल्या नियुक्त्या, परीक्षा आणि मुलाखती नियमित कशा होतील. याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली जाईल, अशी घोषणा केली होती.
Read Also :
- महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर. ; संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा
- अमित शहा-पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- भाजप-राष्ट्रवादी एकत्र येतील यात शंका नाही, अंजली दमानिया म्हणतात….
- ‘ठाकरे सरकारचं पॅकेज घोषित होत पण पोहोचत नाही’, भाजप नेत्यांची खोचक टीका
- वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण नायगाव पोलिस बांधवांना बेघर होऊ देणार नाही; दरेकर