मुंबई: राज्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांची काल टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यलयात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थीत बैठक पार पडली, यावेळी सर्व मंत्र्यांच्या कार्याचा आढावा व सविस्तर चर्चा केली, तसेच पक्ष विस्ताराकरिता आवश्यक त्या सुचना केल्या.
हे पण वाचा: नागपूरातील डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे तरूणाचा पाय निकम्मा; डॉ. अविनाश पोफली यांच्यावर कारवाई होणार?
यावेळी, मंत्री, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण , सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, वर्षाताई गायकवाड, असलम शेख, के.सी. पाडवी , सतेज पाटील, विश्वजीत कदम, आ. प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, आ. प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, महाराष्ट्र सहप्रभारी आशिष दुआ, महाराष्ट्र सह प्रभारी सोनल पटेल, महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, मा. आ. व प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
हे पण वाचा: मोठी बातमी : पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय
नाना पटोले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाला लढणारे कार्यकर्ते हवे आहेत, पक्षासाठी काम करा, कसलीही तडजोड न करता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी उंचावेल यासाठी झोकून देऊन काम करा.
हे पण वाचा: “या सरकाराला आव्हान, तुमच्यात दम नसेल; तर आम्हाला सांगा ४ महिन्यात आरक्षण देतो”
महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या पसंतीला उतरले असून दिड वर्षाच्या कालावधीत झालेल्या विधान परिषद निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झालेली आहे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा, नव्या उत्साहाने व ताकदीने कामाला लागा, असंही पटोलेंनी सांगितलंय.
हे पण वाचा: ईडी म्हणतीये, “अनिल देशमुख कुठे, याची आम्हाला माहिती नाही! आम्ही त्यांची वाट पाहतोय”
माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
टिळक भवन येथे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल आणि विभाग प्रमुखांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी टिळक भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Read Also :
- शरद पवार आणि अमित शहा यांच्यातल्या भेटीचा उलघडा, मात्र ‘त्या’ १५ मिनिटांच्या भेटीत काय झालं?
- क्लिपमधला “तो” आवाज संजय राठोड यांचाच, पुणे पोलिसांनी दिला अहवालाला दुजोरा
- २३ गावांच्या विकास आराखड्याला हाय कोर्टाची स्थगिती; ठाकरे सरकारला दणका
- ‘राज्यात दोन सत्ताकेंद्रं भासवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा प्रयत्न’
- ईडी म्हणतीये, “अनिल देशमुख कुठे, याची आम्हाला माहिती नाही! आम्ही त्यांची वाट पाहतोय”