नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी, गृहमंत्री अमित शहा यांची, केंद्रीय सहकार मंत्री झाल्यावर पहिल्यांदा भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे नेहमीसारखेच तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या बैठकीत नेमकी कशाबद्दल चर्चा झाली, याचा उलगडा स्वतः शरद पवारांनीच ट्विट करून केला आहे. इथेनॉल, MSP आणि इतर काही महत्त्वाच्या विषयांवर आमच्यात चर्चा झाली. आम्ही काही मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
राहुल गांधींच्या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी‘मध्ये दिला गेला, ‘एकी हेच बळ’चा नारा
Had a brief meeting with Union Co-operation Minister Shri Amit Shah in New Delhi today along with Shri Jaiprakash Dandegaonkar,President of NFCSF (National Federation of Cooperative Sugar Factories Ltd) & Prakash Naiknavre to discuss issues faced by the sugar co-operative sector. pic.twitter.com/4jroaBrsGs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2021
याबाबत अधिक माहिती ट्विटवर देताना, साखर क्षेत्रातील सध्याची देशातील स्थिती, जादा साखर उत्पादनामुळं निर्माण झालेल्या समस्या, साखरेचे किमान विक्री मुल्य (MSP) आणि साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती प्रकल्पांची उभारणी, NDRF च्या निकशांमध्ये बदल करण्यासंदर्भात चर्चा झाली असून, साखरेची विक्री किंमत वाढवण्याची आणि इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
We brought to his notice the two most emergent & severe issues like MSP & permissions to set up Ethanol manufacturing units within the premises of sugar mills. We hope that these issues would be favourably considered & resolved at the earliest by Hon’ble Co-operation Minister. pic.twitter.com/9XIE6shDqr
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2021
“राहुल गांधींना मातोश्री, बाळासाहेब आणि शिवसेना जाणून घेण्यात इंटरेस्ट”- संजय राऊत
दरम्यान, या भेटीनंतर शहा-पवारांमध्ये १५ मिनिटं बंद दाराआड स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीवर, राज्यातील पूरपरिस्थितीवर तसेच, पेगासस प्रकरणाबाबत पवारांनी आपली भूमिका शहांकडे मांडली असून, त्यांनीही सरकारची भूमिका त्यांना सांगितल्याचं समजतं. मात्र, याबाबतच्या वृत्ताला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नसून, या बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात असल्याने त्याबाबत वेगवेगळे कयास लढवले जात आहेत.
“…नाहीतर २०१४ सालीच महाविकास आघाडी अस्तित्वात आली असती”, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
यावेळी, त्यांच्यासोबत नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. या बैठकीत संघाच्या वतीने शहा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, आधी देखील शहा-पवार यांच्यात भेट झाली. तेव्हा या दोन नेत्यांच्यात RBI चे नवे नियम आणि सहकार क्षेत्राच्या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली होती. मात्र, त्या १५ मिनिटांच्या चर्चेबाबत अजूनही काही भाष्य केले गेलेलं नाही.
Read Also :
- क्लिपमधला “तो” आवाज संजय राठोड यांचाच, पुणे पोलिसांनी दिला अहवालाला दुजोरा
- २३ गावांच्या विकास आराखड्याला हाय कोर्टाची स्थगिती; ठाकरे सरकारला दणका
- ‘राज्यात दोन सत्ताकेंद्रं भासवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा प्रयत्न’
- ईडी म्हणतीये, “अनिल देशमुख कुठे, याची आम्हाला माहिती नाही! आम्ही त्यांची वाट पाहतोय”
- मोठी बातमी : पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय