मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ बैठकीला विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांसोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही हजेरी लावली होती. या बैठकीतील राहुल गांधी व संजय राऊत यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर भाजपावर टीका केली आहे.
हे पण वाचा: “MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करा”, मागणी घेऊन ठाकरे सरकारचा मंत्री राज्यपाल दरबारी
चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावरही टीका केली होती. ‘मागील दोन वर्षात ठाकरे सरकारनं ‘फटे लेकीन हटे नही’चं धोरण अवलंबलं आहे. ‘औरंगाबादच नाव संभाजी नगर करणारच… कोविडमध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना पन्नास लाख देणार… MPSC च्या सर्व पदांची भरती ३१ जुलैपर्यंत करणार… लॉकडाऊन काळातील वीजबील माफ करणार… अशी आश्वासनं ठाकरे सरकारनं दिली होती. मात्र, त्याचं पुढं काहीच झालं नाही. ‘जे औरंगजेबालाही जमलं नाही, ते वारी बंद करण्याचं कृत्य मात्र या सरकारनं केलं,’ असा संताप वाघ यांनी व्यक्त केला आहे.
राहुलजींनी संजय राऊत यांच्या पाठीवर थाप काय मारली आख्खी भाजपा कामाला लागली. राहिली गोष्ट ताईंच्या 'फटे लेकीन हटे नही' ची तर पतीला वाचवण्यासाठी 'फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे' ही कोलांटीउडी संबंध महाराष्ट्राने पहिली आहे.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 4, 2021
हे पण वाचा: बांधकाम व्यावसायिकचा धक्कादायक दावा, “होय! परमबीर सिंग महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या कटात सामील”
यावर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राहुलजींनी संजय राऊत यांच्या पाठीवर थाप काय मारली आख्खी भाजपा कामाला लागली. राहिली गोष्ट ताईंच्या ‘फटे लेकीन हटे नही’ ची तर पतीला वाचवण्यासाठी ‘फटे इसलीये राष्ट्रवादी से हटे’ ही कोलांटीउडी संबंध महाराष्ट्राने पाहिली आहे,’ अशी खोचक टीका चाकणकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.
Read Also :
- पूरग्रस्तांना दिलेले चेक ‘या’ कारणामुळे घेतले परत, अनिल परब म्हणतात…
- “आरक्षण गेलं हे पाप भाजपचं”, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे-वडेट्टीवार आमनेसामने
- पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक
- जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव
- ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये; पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं