पुणे : चांदणीचौक येथील कामाची पाहणी करायला आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील रात्री उशिरा झालेल्या एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पत्रकारांशी संवाद सुरू असताना चांदणी चौकातून येणाऱ्या तीव्र उतारावरून एका चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो गर्दीच्या ठिकाणी धडकला.
टेंडर ऑफलाईन अन् पालिकेची सभा ऑनलाईन का? काँग्रेस नेते आबा बागुलांचा भाजपला रोखठोक सवाल
चंद्रकांत पाटील यांच्या आजू बाजूला कार्यकर्ते असल्याने त्यांना काही काहीही झालेले नाही. दुचाकीस्वार दारु प्यायला असावा असे वाटून कार्यकर्त्यांनी त्याला मारायला सुरवात केली. त्यानंतर तिथे चंद्रकांत पाटील थांबा आले आणि त्याला मारू नका असे म्हणत त्या दुचाकीस्वाराला लागले नाही ना याची खातरजमा केली.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी चांगले काम केले तर त्यांना चॉकलेट देणार असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी घोषित केले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी चॉकलेट देखील दिले. मात्र त्याचवेळी चांदणी चौकातील कामा बाबत आपण समाधानी नसल्याचे देखील ते म्हणाले. काम चांगले करावे म्हणून चॉकलेट देत आहे असे सांगत दादांनी अधिकाऱ्यांना चॉकलेट वाटले.
Read Also :
- पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड; पाच जण ताब्यात
- डॉ. स्वप्नील शिंदेंची आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, शासनाचे चौकशीचे आदेश
- उदयनराजेंचा गंभीर इशारा, “मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा! नाहीतर…
- अमर, अकबर, अँथनी हिट झाला तसं हे सरकारही हिट होणार! नाना पटोलेंचा पलटवार
- ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयाचा मनमानी कारभार, ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!