काँग्रेस नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. काँग्रेसने आज या बाबत अधिकृत घोषणा केली आहे.
भाजपच्या नेत्यांना आता लोकं कॉमेडी मॅन म्हणायला लागलेत – नाना पटोले
राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. राहुल गांधी प्रत्येक निर्णय घेताना राजीव सातव यांच्याशी चर्चा करायचे. या दोन्ही नेत्यांची चांगली मैत्री होती. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. दरम्यान, मधल्या काळात प्रज्ञा सातव यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेऊन चर्चाही केली होती. राजीव सातव यांच्या निधनानंतर काही महिन्यातच प्रज्ञा सातव ह्या मुलासह गांधी कुटुंबियांच्या भेटीला गेल्या. निमित्त होतं मुलाला मिळालेलं भरघोस यश. राहुल गांधी, प्रियंका गांधींची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनीही सातवांच्या मुलाचं कौतूक केलं. कोरोनाच्या खडतर काळात वडीलांचं निधन आणि त्यात मुलानं मिळवलेलं यश कौतुकास्पदच. काँग्रेस नेत्यांनीही त्याची जाण ठेवली.
वानखेडेंच्या मेव्हणी देखील ड्रग्झचा व्यवसाय करतात का? नवाब मालिकांचे खळबळजनक ट्विट
तसेच राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीत स्थान देण्यता आलं होतं. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देवून पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्या हिंगोली कळमनुरीत सक्रिय झाल्या होत्या. महिलांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते मतदारसंघातील कामांबाबतचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती.
दरम्यान, शरद रणपिसे यांच्या निधानाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसमधून अनेक जण स्पर्धेत होते. काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांचेही नाव विधान परिषदेच्या स्पर्धेत होते. मात्र, अखेर काँग्रेसने दिलेला शब्द पाळत प्रज्ञा सातव यांना उमदेवारी जाहीर केली आहे.
Read Also :
- ठरलं तर..! प्रज्ञा सातवांना विधान परिषदेवर पाठवण्याची काँग्रेसची तयारी?
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मावळली; अंत्यदर्शनाला गर्दी, मान्यवरांकडून श्रद्धांजली
- ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांची लढाई नाही, ही लढाई समाजाला न्याय देण्याची – आशिष शेलार
- काँग्रेसने मित्र पक्षापासून सावध राहावे; नाना पटोलेंच्या मनात राष्ट्रवादीबद्दल सल?
- अरे शहाण्या तू आमदार आहेस; मास्कवरुन अजितदादांच्या रोहित पवारांना भर सभेत कानपिचक्या