मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पडघम वाजला असून सगळेच उमेदवार आता झपाटून प्रचार करतांना दिसत आहे. यातच आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करण्याचे आदेश दिले आहेत. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी लोकप्रतिनिधीकडून कनिष्ठ पदाधिकाऱ्यांना धमकवण्याचा प्रकार समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यावर आता शरद पवार गटाने जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…“शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय दिले ? “नांदेडमध्ये अमित शाहांचा सवाल
भाजप आमदार नितेश राणे यांचा एक संवाद मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दम दिलाय. त्यात ते म्हणाले की, तुम्हाला तुमच्या निवडणुकीत जेवढं मतदान मिळालं होतं. तेवढं किंवा त्यापेक्षा जास्तच मतदान मला हवं आहे. त्यापेक्षा एक टक्का देखील कमी मतदान मिळालं तर मला ते चालणार नाही. मी ०४ जून रोजी सर्वांचा हिशोब घेऊनच बसणार आहे. असं नितेश राणे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“ताई काळजी करू नका विजय तुमचाच”, अल्पसंख्याक समाजातील महिलांची अर्चना पाटलांना ग्वाही
तर दुसऱ्या बाजूला भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे देखील एक विधान वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. खासदार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यात स्पर्धा लावली गेली. लीड देणाऱ्या तालुक्याला देणार ५ कोटी रूपयांचा अधिकचा निधी मिळणार आहे. संजय मंडलिक निवडून आल्यानंतर ज्या तालुक्यातून जास्त लीड पडेल त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच अडीच कोटी रूपयांचा अधिकचा निधी देण्याची शर्यतही चंदगड येथील एका प्रचार सभेत लावण्यात आली.
दरम्यान, यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाने एक व्हिडीओ ट्विट करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मदमस्त सत्ताधारी आपल्या सत्तेचा कसा गैरफायदा घेतात, हे राज्यात भाजप लोकप्रतिनिधी खुलेआम दाखवत आहेत. आचारसंहितेत अशी वक्तव्यं करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कारवाई करणे अपेक्षित आहे. मतदार अशा अहंकारी सत्ताधाऱ्यांचा या निवडणूकीत करेक्ट हिशोब केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा इशाराही त्यांनी दिलाय.
मदमस्त सत्ताधारी आपल्या सत्तेचा कसा गैरफायदा घेतात, हे राज्यात भाजप लोकप्रतिनिधी खुलेआम दाखवत आहेत. आचारसंहितेत अशी वक्तव्यं करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कारवाई करणे अपेक्षित आहे. मतदार अशा अहंकारी सत्ताधाऱ्यांचा या निवडणूकीत करेक्ट हिशोब केल्याशिवाय गप्प बसणार नाही.… pic.twitter.com/Fm8bnsh8MB
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचं”, जयंत पाटलांचा अमित शाहांना टोला
हेही वाचा…“धनंजय सावतांची मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनावर बोळवण,” अर्चना पाटलांना मोठा दिलासा ?
हेही वाचा…बड्या नेत्याने भाजपची साथ सोडली, माढ्यात वेगाने हालचाली सुरू
हेही वाचा…“ना भुजबळ, ना गोडसे, नाशिकच्या जागेसाठी महायुतीचा ‘हा’ नवा उमेदवार सज्ज “