मुंबई : पंकजाताई अनेकवेळा पवारसाहेबांना भेटायला यायची, त्यावेळी आम्ही कधीही राजकारण केलं नाही. मला खरंच त्या मुलीबद्दल प्रेम वाटतंय, याचं कारण असं की, ती एकटी लढतेय. तिचे वडिल गेलेले आहेत. त्यांच्या घरात कोणता कर्ता पुरूष नाही. १९९५ साली भाजपची सत्ता आली. तेव्हा दोन नेत्यांनी महाराष्ट्रात काॅंग्रेस सरकारविरूद्ध रान पेटवलं होतं आणि ते सत्तेत आले होते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे, आज दोघेही हयात नाहीत. मात्र भाजप कोणत्या पद्धतीने आज त्यांच्या मुलींना वागतेवय? असा सवाल करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी सुचवलं ‘या’ नेत्याचं नाव
मागील काही वर्षापासून पंकजा मुंडे राज्यातील राजकारणाच्या केंद्रबिंदूत राहिल्या आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावलण्यात असून त्यांच्यावर भाजपकडून अन्याय होत आहे. यावर पंकजा मुंडेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडेबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर..,’ भाजपचे खासदार अन् यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक वार
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आता निवडणुक आयोगात लढाई सुरू झाली आहे. निवडणुक आयोगात आतापर्यंत दोनदा सुनावणी पार पडली असून या सुनावणीत अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. आता पुढची तारिख नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…चर्चेत असलेले गोगावले मंत्रीपद सोडून शिंदेंना साथ का देताहेत ? गोगावलेंनीच सांगितलं कारण
हेही वाचा…महाराष्ट्राच्या तळागाळातून ठाकरेंना पाठिंबा, मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना लगावला टोला, म्हणाल्या, अहो चित्राताई, अगोदर..,
हेही वाचा…शिवाजी पार्क मैदानावरून दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने माघार का घेतली ? शिंदे गटातील आमदाराने दिले स्पष्टीकरण
हेही वाचा…२०२४ च्या लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, बैठकीत ‘या’ नेत्यांवर केला शिक्कामोर्तब