मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोनवरुन विनंती केल्यानंतर विधान परिषदेत गेलात. त्यामुळे तुम्हाला विधानसभेत जाता येतं, अशी शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना टोला लगावला आहे.
मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉक सुरु करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हे उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मी विधानसभेत तुमच्यामुळे, तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे आहात’, असे सूचक वक्तव्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून केले होते. या वक्तव्यावरूनच भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मी विधानसभेत तुमच्यामुळे; तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विधानसभेत? कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जनतेने तुम्हाला कधी निवडून दिलं? मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात तुम्ही. त्यामुळे विधानसभेत जाता येते तुम्हाला pic.twitter.com/G7qv6zj3Pi— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 28, 2021
‘उद्धव ठाकरे विधानसभेत? कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जनतेने तुम्हाला कधी निवडून दिलं? मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात तुम्ही. त्यामुळे विधानसभेत जाता येते तुम्हाला’, असा टोला ट्विट करत भातखळकरांनी लगावला.
Read Also :
- ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्याला सुरुवात, जयंत पाटील 18 दिवसात घेणार 82 मतदारसंघांचा आढावा
- कृषी कायद्याविरोधात विरोधी पक्षांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार
- ‘वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा’, मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका
- शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी 23 कोटी मंजूर, आदित्य ठाकरेंची माहिती
- ‘काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही, पवारांनी दिलेली वाट तात्पुरती’