नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्याला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये 9 पद्मभुषण तर 91 पद्ममी पुरस्कार जाहीर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून पद्म पुरस्कार पुरस्काराने गौरविण्यात आलेल्यांचे अभिनंदन केले आहे. तर आजच्या सामानामधून भाजप आणि नरेंद्र मोदींवर कडाडून टिका करण्यात आली आहे.
थोरातांचा पाठिंबा नेमका कुणाला ? शुंभागी पाटील कि सत्यजीत तांबे?
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांना यावेळी तरी भारतरत्न ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो. पण होय बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे. अशी गर्जना करून आयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो. असंही सामानातून म्हटलं आहे.
समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांना पद्मभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. एस.एम कृष्णा हे कर्नाटकातील काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकात विधानसभा वोक्लालिगा समाजावर प्रभाव टाकण्यासाठी कृष्णा यांचा गौरव केला गेला, असे सांगितले जाते. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यासाठी हा खटाटोप असला तरी कृष्णा यांच्यासारख्यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल जिवंतपणी पुरस्कार का दिला जात नाही? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
Read also
- “पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजप सर्व पक्षांना पत्र पाठवणार”
- “कोश्यारींच्या जागी, सुमित्रा महाजन की अमरिंदरसिंग ?,; येत्या 15 दिवसात राज्याचा राज्यपाल ठरणार”
- “आयुष्य अन् समाज घाण घडवणे हा भाजपचा एकच कार्यक्रम”, रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
- “भाजपने सर्वात जास्त हल्ले शरद पवारांवर केलेत”, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
- “मोदी साहेब..! NDTV ला अडाणींनी विकत घेतंल, आता BBC ला कोण विकत घेईल?” राष्ट्रवादीने डिवचलं