पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी चांगलीच कंबर कसली आहे. शरद पवार यांच्याकडील वोटबॅंक आपल्याकडे वळविण्याकरिता अजित पवार आता सातत्याने नवनवीन विधान करत आहेत. यातच आता एका कार्यक्रमात अजित पवारांनी स.का.पाटलांचा प्रचार करताना पापापा म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे, अशी घोषणी जॉर्ज फर्नांडिस यांनी दिली होती. तेव्हा सोशल मीडियाही नव्हता. आता काका का असं लिहून प्रचार केला पाहिजे. असं आवाहान अजित पवारांनी केले. त्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर खोचक टिप्पणी केली.
हेही वाचा…भाजपकडून आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच, कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या
अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आव्हाडांनी अजित पवारांवर जोरदार टिका केली. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. अजित पवार यांनी काका का ? असं म्हटलं. त्यावर कारण पुतण्या गद्दार निघाला. वेळ अशी येईल की वेळ येईल विचारण्याची काका का असे करता माफ करा चुकी झाली आणि या वेळेस २०१९ सारखी माफी नाही. गद्दारांना माफी नाही. असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं.
हेही वाचा…राज्यसभेची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टिकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमोल मिटकरी यांनी एक शायरी केली आहे. बेशक उंगली उठा मेरे किरदार पर l शर्थ ये है, तेरी उंगली बेदाग होनी चाहिये ll असं म्हटलं आहे. तर सोबत तथाकथितपुरोगामी असा हॅशटॅग देखील जोडला आहे.
बेशक उंगली उठा मेरे किरदार पर l
शर्थ ये है, तेरी उंगली बेदाग होनी चाहिये ll#तथाकथितपुरोगामी https://t.co/qGGg36qDKX— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 14, 2024
READ ALSO :
हेही वाचा..*कुलकर्णी राज्यसभेवर गेल्याने भाजपचा राजकीय गुंता सुटला, पुणे लोकसभेसाठी भाजपचा ‘हा’ उमेदवार ठरला*
हेही वाचा..राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणाचा आज निकाल लागणार ? सगळ्यांची उत्सुकता पणाला
हेही वाचा..ठाकरे गटाचे ‘हे’ माजी मंत्री शिंदे गटाच्या वाटेवर ? एकनाथ शिंदेंसोबत ती भेट अन्…
हेही वाचा…“ठाकरे गटाचे काही नेते आमच्या संपर्कात, येत्या दोन ते तीन दिवसात…” कुणी केला मोठा दावा ?
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना सरकारने फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”