मुंबई : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपने तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन दिवसाच्या आधी आरोप केले काल पक्षप्रवेश केला आणि आज थेट अशोक चव्हाण यांना उमेदवारी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसमधून शिंदे गटात आलेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावरून आता भाजपाकडे नेतृत्व नसल्यानेच आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच असं म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…जरांगे पाटलांनी लोकसभेची निवडणुक लढवावी, मतदारसंघही ठरवला, कुणी दिला हा सल्ला ?
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजपा हा हवा भरलेला फुगा आहे. तो कधीही फुटू शकतो हे दिसते. आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे. राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिलेला आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झालाय,” नारायण राणे मनोज जरांगे पाटलांवर संतापले
दरम्यान, पक्ष वाढवण्यासाठी जे कार्यकर्ते आयुष्यभर मेहनत करतात त्यांना भाजपा संधी देत नाही. भिती दाखवून, दरोडे टाकून दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपात घेणे, दुसऱ्यांचे पक्ष फोडणे, चोरणे हेच काम भाजपा सध्या करत आहे. भाजपामध्ये नेतेच नाहीत, कालपर्यंत ज्यांना ते ‘डिलर’ म्हणत होते त्यांनाच आता ‘लिडर’ म्हणण्याची वेळ भाजपावर आली आहे. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारीही दिली हेच भाजपाचे Party with difference आहे का ? असा सवाल उपस्थित करत नाना पटोले यांनी भाजपाचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत. असा घणाघात देखील चढवला.
भाजपाकडे नेतृत्व नसल्यानेच आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी… pic.twitter.com/CVVce4Nx17
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 14, 2024
READ ALSO :
राज्यसभेची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा..पार्थ पवार राज्यसभेवर जाणार ? रोहित पवार संतापले, म्हणाले की, अभ्यासू लोकांना..
हेही वाचा…कोण आहेत डॉ. अजित गोपछडे ? भाजपकडून राज्यसभेसाठी ‘तीन’ उमेदवार मैदानात
हेही वाचा…शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून अनेपक्षित उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
हेही वाचा…राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी, भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर