मुंबई : आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन दिवसापुर्वीच भाजपमध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जागी उमेदवारी जाहीर केली आहे. तर विद्यमान खासदार प्रकाश जावडेकर आणि व्ही. व्ही मुरलीधरन यांचा देखील भाजपने पत्ता कट केला आहे. त्यांच्या जागी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा…“शरद पवार आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार का ?” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्याआधी आज भाजपकडून अशोक चव्हाण यांच्यासह माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊन भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
हेही वाचा…राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ? हालचाली वाढल्या
अजित गोपछडे यांच्यावर सध्या भाजपकडून उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते भाजपसोबत काम करतांना दिसत आहेत. याचसोबत अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले कार्यकर्ते असून त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कातून एबीव्हीपी परिषदेच्या माध्यमातून समोर आले होते. यातच लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी अजित गोपछडे यांच्या नावाची जोरदार चर्चेत आलं होतं. त्याचबरोबर त्यांनी नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहून भूमिका घेतली आहे. महाविद्यालयात असताना त्यांनी मार्डच्या चळवळीतून नेतृत्व केले आहे.
दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्यावर ६४ हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना डावलून मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर पुण्यात भाजपच्या अंतर्गत राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर मेधा कुलकर्णी यांना विधान परिषद, तसेच राज्यसभेवर पाठवण्यात येणार अशा चर्चा देखील होत्या. तेव्हापासून मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन कुठे होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून अनेपक्षित उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
हेही वाचा…राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी, भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर
जरांगे पाटलांनी लोकसभेची निवडणुक लढवावी, मतदारसंघही ठरवला, कुणी दिला हा सल्ला ?
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झालाय,” नारायण राणे मनोज जरांगे पाटलांवर संतापले
हेही वाचा…महाराष्ट्रात कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर, कॉंग्रेसने पुन्हा लंगड्या उमेदवारावर डाव टाकला