मुंबई : राज्यात सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होऊ घातली आहे. येत्या २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उद्या अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत असणार आहे. यातच आता कॉंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा…राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ? हालचाली वाढल्या
सहा जागांसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी राज्यसभेची निवडणुक होऊ घातली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे तीन उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि नांदेडचे अजित गोपछडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा…दादांसाठी विधानसभेत डावललं, आता राज्यसभेच्या रिंगणात, मेधा कुलकर्णींना लागणार मोठी लॉटरी ?
यातच आता अलिकडेच कॉंग्रेसकडून शिंदे गटात प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांना शिंदे गटाकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु अजित पवार गटाकडून अद्याप कोणताही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.
READ ALSO :
हेही वाचा…राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी, भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर
जरांगे पाटलांनी लोकसभेची निवडणुक लढवावी, मतदारसंघही ठरवला, कुणी दिला हा सल्ला ?
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झालाय,” नारायण राणे मनोज जरांगे पाटलांवर संतापले
हेही वाचा…महाराष्ट्रात कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर, कॉंग्रेसने पुन्हा लंगड्या उमेदवारावर डाव टाकला
हेही वाचा…“शरद पवार आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार का ?” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…