नवी दिल्ली : राज्यात सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होऊ घातली आहे. येत्या २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उद्या अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत असणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप आपला चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. यातच या निवडणुकीसाठी भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने देखील मोठ्या हालचाली सुरू केल्या असून आपला उमेदवार जाहीर केला आहे.
हेही वाचा…“आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला, तो भाजपलाच धक्का”
कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रात चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागच्या विधानपरिषद निवडणुकीत देखील चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. चंद्रकांत हंडोरे हे अधिकृत उमेदवार असूनही क्रास मतदान झाल्याने त्यांचा पराभव झाला होता. यातच यावेळी देखील कॉंग्रेसकडे विजय होण्यासाठी काठावर मत आहेत. अशा वेळी देखील कॉंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना पुन्हा तिकीट दिले आहे.
हेही वाचा…“अशोक चव्हाण हे दोन वर्षापुर्वीच कॉंग्रेस सोडणार होते, पण…. कुणी केला हा दावा ?
चंद्रकांत हंडोरे हे कॉंग्रेसचे दलित समाजतील आहेत. मागच्या वेळी क्रास मतदान झाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यातच आता ज्या उमेदवाराला पाडल्याने भाजपवर काही दोषारोप ठेवता येईल. अशी रणनिती महाविकास आघाडीने आखली असल्याचे बोललं जात आहे. यातच सोनिया गांधी यांनी देखील राजस्थानमधून आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. तर बिहारमधून अखिलेख प्रसाद सिंग, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी यांनी कॉंग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार का ?” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ? हालचाली वाढल्या
दादांसाठी विधानसभेत डावललं, आता राज्यसभेच्या रिंगणात, मेधा कुलकर्णींना लागणार मोठी लॉटरी ?
हेही वाचा…निवडणुका येईपर्यंत सगळे आरोपी भाजपमध्ये दिसतील, मग ‘देवाभाऊ’ घसा खरडून कोणावर आरोप करतील ?
हेही वाचा…भाजप शिंदे गटाला देणार झटका, नारायण राणे रत्नागिरी- सिंधूदुर्गातून लोकसभेच्या रिंगणात