पुणे : राज्यात झालेल्या पक्ष फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण सगळचं बदलून गेलं आहे. यातच आज शरद पवार यांनी शरद पवार गटातील सर्व नेत्यांची तातडीने बैठक घेतली असून शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर निवडणुक आयोगाने चिन्ह आणि पक्षनाव अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“अशोक चव्हाण हे दोन वर्षापुर्वीच कॉंग्रेस सोडणार होते, पण…. कुणी केला हा दावा ?
येणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. यातच इंडिया आघाडीची मोठी सभा पुण्यात होणार आहे. यासंदर्भात आज चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी आणि इंडियाची पहिला मेळावा २४ तारखेला पुणे शहरात आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व नेते उपस्थित राहणार आहे. तर येत्या १९ फेब्रवारीला शरद पवार मंचर येथील सभेले संबोधित करणार आहेत. तसेच कोणतंही चिन्ह आणि पक्ष नाव मिळालं तर ते घेऊन आम्ही जनतेसमोर जाण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे याठिकाणी कोणत्याही पक्षात विलीन व्हावं, तसेच चिन्ह घेणे यामध्ये तथ्य नाही. या चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. परंतु आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचं नाव घेऊन आम्ही जाणार आहोत. यातच ज्या लोकांना शरद पवारांच्या नावाचं भयं वाटतं. ते लोक अशा बातम्या पेरत असल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“नांदेड कुणा एका व्यक्तीचा बालेकिला नाही,” नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर पहिला वॉर
दरम्यान, निवडणुक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना देण्यात आले आहे. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार गटाने सर्व कार्यालयातून चिन्ह आणि झेंडे काढून घेतले आहेत. यातच निवडणुक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेले, परंतु त्यावर अद्यापही कोणतीही सुनावणी झाली नाही. यातच कालच कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ? हालचाली वाढल्या
दादांसाठी विधानसभेत डावललं, आता राज्यसभेच्या रिंगणात, मेधा कुलकर्णींना लागणार मोठी लॉटरी ?
हेही वाचा…निवडणुका येईपर्यंत सगळे आरोपी भाजपमध्ये दिसतील, मग ‘देवाभाऊ’ घसा खरडून कोणावर आरोप करतील ?
हेही वाचा…भाजप शिंदे गटाला देणार झटका, नारायण राणे रत्नागिरी- सिंधूदुर्गातून लोकसभेच्या रिंगणात
हेही वाचा…“आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला, तो भाजपलाच धक्का”