मुंबई : राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत चालला आहे. सगेसोयऱ्यांची मागणी मान्य केल्यानंतरही मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यातच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…भाजप शिंदे गटाला देणार झटका, नारायण राणे रत्नागिरी- सिंधूदुर्गातून लोकसभेच्या रिंगणात
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत. असं देखील नारायण राणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला, तो भाजपलाच धक्का”
दरम्यान, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे लावून धरली आहे. यातच आता राज्यात अनेक ठिकाणी लाखोंच्या संख्यने मराठा समाजाच्या नोंदी या कुणबी म्हणून सापडल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तर सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे,असा शब्द सरकारने दिला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे.
*“जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झालाय,” नारायण राणे मनोज जरांगे पाटलांवर संतापले*
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्रात कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर, कॉंग्रेसने पुन्हा लंगड्या उमेदवारावर डाव टाकला
हेही वाचा…“शरद पवार आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार का ?” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ? हालचाली वाढल्या
दादांसाठी विधानसभेत डावललं, आता राज्यसभेच्या रिंगणात, मेधा कुलकर्णींना लागणार मोठी लॉटरी ?
हेही वाचा…निवडणुका येईपर्यंत सगळे आरोपी भाजपमध्ये दिसतील, मग ‘देवाभाऊ’ घसा खरडून कोणावर आरोप करतील ?