मुंबई : निवडणुक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी आमदार अपात्र निकालाचं वाचन सांयकाळी करणार आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर दोन्ही बाजूने आमदार अपात्रबाबत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना प्रकरणानंतर आता राष्ट्रवादी प्रकरणाकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा..पार्थ पवार राज्यसभेवर जाणार ? रोहित पवार संतापले, म्हणाले की, अभ्यासू लोकांना..
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर नार्वेकरांसमोर सुनावणी झाली. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले. केंद्रीय निवडणुक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मुळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता.
हेही वाचा…कोण आहेत डॉ. अजित गोपछडे ? भाजपकडून राज्यसभेसाठी ‘तीन’ उमेदवार मैदानात
या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहातून नार्वेकर काय निकाल देणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच यापुर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला होता. त्यांच्याकडील आमदारांचे संख्याबळ पाहता हा निकाल देण्यात आला होता.
READ ALSO :
हेही वाचा..ठाकरे गटाचे ‘हे’ माजी मंत्री शिंदे गटाच्या वाटेवर ? एकनाथ शिंदेंसोबत ती भेट अन्…
हेही वाचा…“ठाकरे गटाचे काही नेते आमच्या संपर्कात, येत्या दोन ते तीन दिवसात…” कुणी केला मोठा दावा ?
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना सरकारने फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”
हेही वाचा…भाजपकडून आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच, कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या
राज्यसभेची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…