मुंबई : अनेक दशकं कॉंग्रेसमध्ये राहून तसेच विविध पदांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पडल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर अशोक चव्हाण यांना आता भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे १५ आमदार देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय शिरसाठ यांनी केलाय.
हेही वाचा…शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून अनेपक्षित उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
संजय शिरसाट म्हणाले की, अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे काही नेते आणि आमदार आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत. ते आमच्या संपर्कातही आहेत. ते नेते कोण आहेत, ते आताच सांगणे योग्य होणार नाही. मात्र यामध्ये काही नेते आणि आमदारांचा समावेश आहे. या सर्वांचा खुलासा अवघ्या दोन ते तीन दिवसांत कोल्हापुरच्या अधिवेशनात होईल असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी, भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर
दरम्यान, अशोक चव्हाण भाजपात जाण्याची माहिती अगोदर लागली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच येण्याऱ्या काही दिवसात कॉंग्रेसचे अनेक नेते तुम्हाला भाजपात जाताना दिसतील. कॉंग्रेस पक्ष कधीही फुटू शकतो त्यांना कोणीही वाली राहिला नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना सरकारने फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”
हेही वाचा…भाजपकडून आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच, कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या
राज्यसभेची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा..पार्थ पवार राज्यसभेवर जाणार ? रोहित पवार संतापले, म्हणाले की, अभ्यासू लोकांना..
हेही वाचा…कोण आहेत डॉ. अजित गोपछडे ? भाजपकडून राज्यसभेसाठी ‘तीन’ उमेदवार मैदानात