नाशिक : ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. घोलप यांनी अद्याप तसा निर्णय घेतला नाही. परंतु आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशकात ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा…कोण आहेत डॉ. अजित गोपछडे ? भाजपकडून राज्यसभेसाठी ‘तीन’ उमेदवार मैदानात
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद काढून घेतल्यापासून ते ठाकरे गटात नाराज असून त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. मात्र तो नाकारण्यात आला. खासदार संजय राूत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घोलप यांनी बाजू मांडली होती. गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनाला ते उपस्थितत नव्हते. गेल्या आठवड्यात चर्मकार समाज संघटनेच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली आहे.
हेही वाचा…शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून अनेपक्षित उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
शिंदे यांनी चर्मकार समाजाच्या ९० टक्के मागण्या मान्य केल्या असल्याचे घोलप यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नाशिकमध्ये याचा ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची ताकद आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरे गटाचे काही नेते आमच्या संपर्कात, येत्या दोन ते तीन दिवसात…” कुणी केला मोठा दावा ?
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना सरकारने फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”
हेही वाचा…भाजपकडून आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच, कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या
राज्यसभेची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा..पार्थ पवार राज्यसभेवर जाणार ? रोहित पवार संतापले, म्हणाले की, अभ्यासू लोकांना..