IMPIMP

हाथरस प्रकरण : …अन्यथा त्या कुटुंबाला माझ्या घरी घेऊन जातो – चंद्रशेख आझाद

हाथरस (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपुर्ण देश हादरला आहे. पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली जात असून, राजकीय नेते त्यांची भेट घेत आहे. आता भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी त्यांची भेट घेत वाय दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

आज चंद्रशेखर आझाद यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पीडितेच्या कुटुंबीयांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. अन्यथा आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ. ते इथे सुरक्षित नाहीत. या घटनेचा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधीशांच्या निगराणीखाली चौकशी करण्यात यावी.

दरम्यान, काल काँग्रेस नेते राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी यांनी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले होते