भोसरी: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. २०१६ मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांचे युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. काल दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली.
हे पण वाचा: मी फडतूस माणसांविषयी बोलत नाही, नितेश राणे यांच्या टीकेला भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर
हे पण वाचा: भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही
NCP leader Eknath Khadse's son-in-law was arrested in the Pune land deal case yesterday. He was called for questioning and later placed under arrest: Enforcement Directorate
— ANI (@ANI) July 7, 2021
गिरीश चौधरी यांना ईडीने रात्री अटक केल्याचे आज सकाळी जाहीर केले. यामुळे आता एकनाथ खडसे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितले होते. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एमआयडीसीची होती असे नंतर समोर आले.
हे पण वाचा: भास्कर जाधवांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या, केली सुरक्षा पुरवण्याची मागणी
हे पण वाचा: त्यांना परवानगी दिली कोणी; भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल
ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते.