पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी अटक केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ईडीने भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी खडसे यांनाही समन्स पाठवले आहेत.
हे पण वाचा: ‘नारायण राणेंपेक्षा संभाजीराजेंना मंत्री केलं असतं तर महाराष्ट्राचा सन्मान झाला असता’
हे पण वाचा: जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटक होणार?
पाठवलेल्या नोटीसनुसार खडसे यांना गुरुवारी (८ जुलै) सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.विशेष म्हणजे या प्रकरणाची कारवाई थांबवण्यासाठी एकनाथ खडसे हायकोर्टात गेले आहेत. हायकोर्टाने ईडीला सुनावणी सुरु असेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. पण चौकशीबाबत अद्याप कोणतेही आदेश दिलेले नाहीत. कोर्टाचे आदेश असल्याने एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई होणार नाही. मात्र, त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
हे पण वाचा: भोसरी जमीन आर्थिक घोटाळा : एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांची उद्या दि. ८ जुलै रोजीची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे. माध्यमकर्मींनी कृपया याची नोंद घ्यावी. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. धन्यवाद.
— NCP (@NCPspeaks) July 7, 2021
खडसेंंची पत्रकार परिषद रद्द
आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना समन्सच्या माध्यमातून देण्यात आले. तत्पूर्वी ईडी कार्यालयातल्या हजेरीअगोदर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. या पत्रकार परिषदेत ते काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद खडसेंना रद्द करावी लागलेली आहे.
हे पण वाचा: पक्ष वाढविण्यासाठी वाटेल ते, आयारामांना मंत्रीपद, निष्ठावंतांना धत्तुरा!
हे पण वाचा: केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान, मुंडे भगीनींचे पंक छाटण्याचा प्रयत्न?
खडसेंना मंत्रीपद गमवावं लागलं…!
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे यांना फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री पद गमवावे लागले होते. यानंतर खडसे यांची चौकशी झाली. झोटिंग समितीने त्यांना क्लीन चिट देखील दिली. मात्र पुन्हा एकदा त्यांना चौकशीला सामोरे जावं लागलं. पदाचा दुरुपयोग करत जमिन खरेदी केल्याचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप आहे.