नवी दिल्ली : युक्रेनमधील खारकीव शहरात रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. परराष्ट्र मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नवीन शेखरप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे. युक्रेनमध्ये सध्या अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत अनेक विमानांद्वारे भारतात सुखरुप परत आणण्यात आलं आहे.
Ministry of External Affairs says that an Indian student lost his life in shelling in Kharkiv, Ukraine this morning. The Ministry is in touch with his family. pic.twitter.com/EZpyc7mtL7
— ANI (@ANI) March 1, 2022
परराष्ट्र मंत्रालयाचे अरिंदम बागची म्हणाले, आम्हाला सांगायला अतिशय वाईट वाटतंय की सकाळी खारकीव शहरात झालेल्या बॉम्ब हल्ल्या एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र मंत्रालय त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. परराष्ट्र सचिव रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांना फोन केला असून खारकीव्ह सह इतर डेंजर झोनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप व्यवस्था करावी.
Read also:
- 4 मंत्री युक्रेनला पाठवून भाजपचा राजकीय इव्हेंट; भुजबळांचा केंद्र सरकारवर घणाघात
- ईडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे ? सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल
- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; नवाब मलिकांचा मुद्दा अधिवेशनात गाजणार?
- अन्य दोन पक्ष वाया गेले, आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडे – आशिष शेलार
- संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयात जमा केले पुरावे; कारवाईची मागणी