मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर संजय राऊत यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. नील सोमय्यांवर पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांच्याशी संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर नील सोमय्यांनी यासंदर्भात कोर्टात धाव घेतली. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. अशातच आता किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
लक्ष नाय काय म्हणता, या माणसाला टीका करण्याखेरीज काम नाही – नारायण राणे
किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, पोलीस आयुक्त आले तरी माझ्यावर कारवाई करू शकणार नाहीत. राज्य सरकारने काल जनतेला कळवलं की नील सोमय्या निर्दोष आहे. त्यांना मुंबई पोलिसांनी निर्दोष ठरवलं नाही तर त्यांची बदली केली. उद्धव ठाकरे हे मेधा सोमय्या, नील सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाही, घोटाळे तर ऊद्धव ठाकरे करतात, असा आरोप ही किरीट सोमय्यांनी लावला आहे.
संजय राऊत अजून एक राजकीय बॉम्ब फोडण्याच्या तयारीत; लवकरच पत्रकार परिषद घेणार
संजय राऊत तुम्ही नौटंकीबाज आहेत. हे कबूल करा, कसला तो गेम बिगीन, इडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे आहे, असा सवाल ही सोमय्यांनी केला. तसेच पेड मीडिया एजन्सी सल्ला देते, मोदी सरकार मागे लागलीये असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पोलीस आयुक्ताची हकालपट्टी का केली ते सांगा? असंही किरीट सोमय्या म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना इशारा देताना म्हटलं होतं की बाप बेटे लवकरच तुरुंगात जाणार. त्यानंतर लगेचच किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्यांनी कोर्टात धाव घेतली होती.
Read also:
- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; नवाब मलिकांचा मुद्दा अधिवेशनात गाजणार?
- अन्य दोन पक्ष वाया गेले, आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडे – आशिष शेलार
- संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयात जमा केले पुरावे; कारवाईची मागणी
- ईडीच्या कारवाईच्या विरोधात नवाब मलिक आक्रमक; मुंबई उच्च न्यायालयात मागितली दाद
- आता जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम करायचा; खासदार विखेंचा महाविकास आघाडीला इशारा