नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने आँपरेशन गंगा सुरू केले आहे. आता पर्यंत 900 विद्यार्थ्यांना भारतात सुखरूप आणल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तसेच अजूनही भरपूर विद्यार्थी युक्रेनमध्येच आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार यावर राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
दोन विमाने आले म्हणजे सगळे विद्यार्थी आले असं होत नाही; विजयी वडेट्टीवारांचा केंद्र सरकारला टोला
केंद्र सरकारच्या मिशन गंगा अंतर्गत आज 182 विद्यार्थी परत आले आहेत. त्याचा मला खूप आंनद आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये भारतीय अजूनही अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. विमान लँड झाल्यानंतर मी प्रत्यक्ष विमानात जाऊन विद्यार्थ्यांना भेटलो. विद्यार्थी खूप घाबरले आहेत. त्यानंतर त्यांचं आम्ही स्वागत केले. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढवलंय. त्यांच्या मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, असंही नारायण राणे म्हणाले.
वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती, चिरंजीवला दिल्लीची स्वप्ने; भातखळकरांची टीका
युक्रेनहून भारतीयांना परत आणण्याची मोहीम शिवसेनेने सुरु केली का? असा टोला संजय राऊत यांना लगावत नारायण राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल संजय राऊत यांनी कधी चांगलं म्हटलं आहे का? हा माणूस शुद्धीत असतो का? भारत सरकारने चार मंत्र्यांची नेमणूक केली आहे. मला इथे पाठवलं. लक्ष नाय काय म्हणता. या माणसाला टीका करण्याखेरीज काही काम नाही, असा टोला ही नारायण राणे यांनी लगावला. केंद्र सरकारच्या आँपरेशन गंगा या कार्यक्रमावरून विरोधी पक्षांनी भाजपवर टीका केली आहे. उत्तर प्रदेश च्या निवडणुकांमुळे आँपरेशन गंगा हे नाव दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also:
- छत्रपती आणि मराठा समाजाची आता तरी फसवणूक करू नका; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला
- मराठा समाजाच्या प्रमुख पाच मागण्या सरकार पूर्ण करणार; संभाजीराजेंच्या कोणत्या मागण्या होत्या…
- नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी; त्या आधी समोर आली माहिती
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यांवर इडीची कारवाई; तब्बल 13 कोटी 41 लाख मालमत्ता जप्त
- नंदुरबारमध्ये दाऊद इब्राहिमच्या पुतळ्याचे दहन करत ठाकरे सरकारचा नोंदवला निषेध