मुंबई : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना धाक भरला आहे. कारण राज्यातील अनेक नेत्यांच्या घरांवर ईडी, आयटी या संस्था धाडी पडत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे राज्य ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर इडीने कारवाई केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
नारायण राणे, नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ; मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता इडीचे जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली एकुण मालमत्ता ही 13 कोटी 41 लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमधील अजून एक नेता इडीच्या रडारवर आला आहे.
शिवसेनेचे नेते आणि पालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांची कसुन चौकशी करण्यात आली. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर इडीने कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दिवसेंदिवस महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर इडीची धाड पडत आहे. यावरून सत्ताधारी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहे. त्यामुळे राज्यातील मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून आलं आहे.
Read also:
- नंदुरबारमध्ये दाऊद इब्राहिमच्या पुतळ्याचे दहन करत ठाकरे सरकारचा नोंदवला निषेध
- वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती, चिरंजीवला दिल्लीची स्वप्ने; भातखळकरांची टीका
- दोन विमाने आले म्हणजे सगळे विद्यार्थी आले असं होत नाही; विजयी वडेट्टीवारांचा केंद्र सरकारला टोला
- संयम संपला: संध्याकाळ पर्यंत पत्र आलं नाही तर…; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
- मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्या हातात जे आहे ते करू, मात्र…