मुंबई : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्याठिकाणी आता परीस्थिती भयानक होत चालली आहे. शिक्षणासाठी गेलेले अनेक देशातील विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. भारतीय मुलांना देशात आणण्यासाठी केंद्र सरकार गंगा मिशन हे नाव देऊन भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
युक्रेनमधून इतर देशांनी आपले नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केलेत. मात्र युद्धजन्य परीस्थितीत केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलली नाहीत. सध्या त्याठिकाणी 25 ते 30 हजार भारतीय मुलं अडकले आहेत. मात्र केंद्र सरकारने आतापर्यंत फक्त 900 मुलांना मायदेशी आणलं आहे. काही मुलं 40 किमीचा प्रवास करून थंडीत उघड्यावर झोपले होते. दोन विमाने आले म्हणजे सर्व विद्यार्थी आले असं होत नाही. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी आणवं, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
4 दिवस 75 तासानंतर यशवंत जाधवांच्या घरावरील कारवाई थांबवली; महत्वाची माहिती समोर
युक्रेनमधून भारतीय मुलांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने मिशन गंगा हे नाव दिलं आहे. त्यावर टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने त्यांना घरी पोहचवणार आहोत. केंद्र सरकारने आँपरेशन गंगा सुरू केलं आहे. ते वाहून जाता कामा नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
मला आता कुठपर्यंत न्यायचं हे सरकारनं ठरवावं – छत्रपती संभाजी राजे
युक्रेनमध्ये गेल्या आठवड्यापासून युद्ध सुरू आहे. त्याठिकाणी अनेक भारतीय मुलं अडकली आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने आँपरेशन गंगा सुरू केलंय. मात्र विरोधकांनी यावरून जोरदार टीका करत फक्त निवडणुकांसाठीच सुरू केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.
Read also:
- संयम संपला: संध्याकाळ पर्यंत पत्र आलं नाही तर…; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
- मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्या हातात जे आहे ते करू, मात्र…
- भाजपने आता नवीन शिव व्याख्याते निर्माण केले का? राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया
- नारायण राणे, नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ; मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर रोहित पवारांचे ते ट्विट चर्चेत; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकही…