मुंबई : शिवसेनेचे नेते आणि पालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती तर शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रखर शब्दात टीका करण्यात आली. तब्बल चार दिवस 75 तास सुरू असलेली चौकशी अखेर आज थांबवली. या चौकशीत आयकर विभागाच्या हाती खूप मोठी माहिती लागली आहे.
भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे, तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं – शिवसेना
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. मागच्या शुक्रवारपासून आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी कसुन चौकशी करीत होते. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर या प्रकरणावरून जोरदार हल्ला चढवला.
सरकारने काही केले नाही, हे चुकीचे ठरेल; मराठा आरक्षणावरून संभाजी राजेंना चव्हांणाचं उत्तर
आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या संबंधित 33 ठिकाणी झाडाझडती घेतली. यामधून 2 कोटींच्या रकमेसह महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाने जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर जवळपास 75 तास चौकशी केली. यशवंत जाधव यांच्या घरावर झालेल्या झाडाझडतीवर शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध दर्शविला. सुडाच्या भावनेने ही कारवाई झाल्याचा आरोप ही शिवसेनेने केला आहे.
Read also:
- छत्रपती संभाजी राजेंना राज्य सरकारकडून चर्चेच निमंत्रण; मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होणार बैठक
- शिवाजी महाराज, रामदास स्वामीच्या कोणताही पुरावा नाही; राज्यपालांच्या वक्तव्यांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- नवाब भाईंसाठी आता एमआयएम मैदानात ; खासदार इम्तियाज जलील करणार आंदोलन
- राष्ट्रवादी परिसंवाद अन् पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज!
- भाजप आमदाराची जीभ घसरली; मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरतांना म्हणाले की, मी आजपर्यंत बेशर्म, नालायक…