नागपूर : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली देखील भाजपने मुंबईत आंदोलन करत राजीनाम्याची मागणी केली. भाजप आता राज्यात सर्वत्र आंदोलन करत असताना नागपूर येथील एका आमदारांची बोलत असताना जीभ घसरली. तसेच मुख्यमंत्र्यांबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य देखील केले.
राष्ट्रवादीचा हरामखोर जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा? चित्रा वाघ यांनी अशोक गावडेविरोधात खोचला पदर
नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आज लकडगंज पोलीस स्थानकात आले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की ज्या दाऊद नी हजारो निष्पाप लोकांचा जीव घेतला. त्याच्याशी जमीन व्यवहार केला. त्या नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आलो आहे.
…जोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी तोपर्यंत..; अजित पवारांचा भाजपला टोला
कृष्णा खोपडे यांनी यावेळी ठाकरे सरकारवर टीका करताना मुख्यमंत्र्यांबाबत बेशर्म आणि नालायक शब्दाचा वाटर केला. ते म्हणाले की, दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. महाविकास आघाडीचे अनेक मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. या राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म आणि नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो मंत्री तुरुंगातमध्ये असून सुद्धा राजीनामा घेत नाही. खोपडे यांच्या वक्तव्यांवरून राज्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता बऱ्याच दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात या राजकीय घटनांचे पडसाद कसे उमटतील ते आता पहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Read also:
- सरकारने काही केले नाही, हे चुकीचे ठरेल; मराठा आरक्षणावरून संभाजी राजेंना चव्हांणाचं उत्तर
- भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे, तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं – शिवसेना
- संजय राठोड यांचा तात्काळ राजीनामा घेतला, राष्ट्रवादी नेत्याचा का नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- सरकारने शब्द पाळला नाही, त्यामुळेच उपोषण..; संभाजी राजेंनी व्यक्त केली खंत
- आमचा झेंडा भगवा असला तरी…; अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलील यांना टोला