मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा भेडसावणारा प्रश्न सरकारकडून सुटता सुटेना झाला आहे. त्याविरोधात येऊन आता राज्य सभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे मैदानात उतरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर छत्रपती संभाजी राजे अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि आज आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडलेला आहे.
संजय राठोड यांचा तात्काळ राजीनामा घेतला, राष्ट्रवादी नेत्याचा का नाही? चंद्रकांत पाटलांचा सवाल
मागील दोन दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार राजू शेवाळे, खासदार अरविंद सावंत यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आहे आणि लवकरात लवकर सरकारला निर्णय घेण्यास लावू असं आश्वासन दिलं आहे. आता उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महत्वाची बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये राज्य सरकार छत्रपती संभाजी राजे यांच्याशी चर्चा करण्यास पुढे सरसावले आहे आणि चर्चेसाठी राजेंना निमंत्रण देण्यात आले आहे .
भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे, तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं – शिवसेना
राज्य सरकारकडून आज ११ वाजता छत्रपती संभाजी राजेंना चर्चेसाठी निमंत्रित करण्यातआले आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि इतर समन्वयकांशी बोलून निर्णय घेणार, असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगितीबाबत राज्य सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत. आज सकाळी यासंदर्भात ११ वाजता महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. आज सकाळीच जे जे रुग्णालयातून ४ डॉक्टरांचे एक पथक छत्रपती संभाजी राजे यांच्या तपासणीसाठी आझाद मैदानात दाखल झालं आहे. या वैद्यकीय तपासणीत संभाजीराजे यांचे ब्लड प्रेशर आणि शुगर लो असल्याचे आढळले असल्याची माहिती जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
Read also:
- शिवाजी महाराज, रामदास स्वामीच्या कोणताही पुरावा नाही; राज्यपालांच्या वक्तव्यांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- नवाब भाईंसाठी आता एमआयएम मैदानात ; खासदार इम्तियाज जलील करणार आंदोलन
- राष्ट्रवादी परिसंवाद अन् पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज!
- भाजप आमदाराची जीभ घसरली; मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरतांना म्हणाले की, मी आजपर्यंत बेशर्म, नालायक…
- सरकारने काही केले नाही, हे चुकीचे ठरेल; मराठा आरक्षणावरून संभाजी राजेंना चव्हांणाचं उत्तर