मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा भेडसावणारा प्रश्न सरकारकडून सुटता सुटेना झाला आहे. त्याविरोधात येऊन आता राज्य सभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे मैदानात उतरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर छत्रपती संभाजी राजे अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि आज आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडलेला आहे.
सरकारने काही केले नाही, हे चुकीचे ठरेल; मराठा आरक्षणावरून संभाजी राजेंना चव्हांणाचं उत्तर
मागील दोन दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार राजू शेवाळे, खासदार अरविंद सावंत यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आहे आणि लवकरात लवकर सरकारला निर्णय घेण्यास लावू असं आश्वासन दिलं आहे. छत्रपती संभाजी राजेंची तब्येत आता काहीशी खालावली आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी याबाबत भाष्य केले आहे. राजेंचा रक्तदाब कमी झाला आहे आणि राजेंना आता अशक्तपणाही राजेंना आलेला आहे. याबात छत्रपती संभाजी राजे यांना राज्य सरकारकडून निमंत्रण धाडण्यात आले आहे.
भाजप आमदाराची जीभ घसरली; मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरतांना म्हणाले की, मी आजपर्यंत बेशर्म, नालायक…
याबाबत छत्रपती संभाजी राजे यांनी भाष्य करताना म्हटलं आहे की आज चर्चेसाठी बोलवण्यात आलेलं आहे. मात्र आता समाजाने आणि सरकारने ठरवायचं आहे की मला कुठपर्यंत न्यायचं आहे. आज जरी माझी तब्येत खालावली असली तरीदेखील मी तुसभरही मागे हटणार नाही. काही विषय हे राज्य सरकारच्या आखायतरीत्या आहेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आज मांडा असा सल्ला देखील छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारला दिला आहे. एवढंच नाही तर मराठा समाजाने देखील कायदा, सुव्यवस्था निर्माण होईल असं काहीही करू नये. मराठा समाजाचे प्रतिनिधी तिथं पाठवणार असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.
Read also:
- 4 दिवस 75 तासानंतर यशवंत जाधवांच्या घरावरील कारवाई थांबवली; महत्वाची माहिती समोर
- छत्रपती संभाजी राजेंना राज्य सरकारकडून चर्चेच निमंत्रण; मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होणार बैठक
- शिवाजी महाराज, रामदास स्वामीच्या कोणताही पुरावा नाही; राज्यपालांच्या वक्तव्यांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- नवाब भाईंसाठी आता एमआयएम मैदानात ; खासदार इम्तियाज जलील करणार आंदोलन
- राष्ट्रवादी परिसंवाद अन् पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज!