अलिबाग : भाजप खासदार संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला आता दोन दिवस उलटले आहेत. खासदार संभाजी राजे यांची त्याठिकाणी अनेक नेते भेटी घेत आहेत. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले आहे.
केंद्र सरकारने संसदेत मराठा आरक्षणाबाबत बिल सादर करावा, मात्र आंदोलन न करता यातून मार्ग काढावा असं आवाहन संभाजी राजे यांनी केले होते. त्यावर अजित पवार म्हणाले की, राज्याच्या अखत्यारीत असलेला प्रश्न आम्ही सोडवू, मात्र राज्यातील अखत्यारीत नसलेले प्रश्न सोडविणे कठीण आहे. त्यामुळे पुढे यासंबंधी काय संभाजी राजे भूमिका घेणार ते महत्वाचे आहे.
दरम्यान आंदोलन सुरू असतानाच संभाजी राजे यांची अचानक तब्बेत बिघडली. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. विरोधी तसेच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आझाद मैदानावर संभाजी राजे यांची भेट घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मराठा आरक्षणासंबंधी चर्चा करण्यासाठी बोलवलं आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलन सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात यासाठी आंदोलने करण्यात आली. त्यामुळे यातून काहीही मार्ग निघाला नसल्याने अखेर संभाजी राजेंनी उपोषण सुरू केले.
Read also:
- भाजपने आता नवीन शिव व्याख्याते निर्माण केले का? राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया
- नारायण राणे, नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ; मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर रोहित पवारांचे ते ट्विट चर्चेत; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकही…
- मला आता कुठपर्यंत न्यायचं हे सरकारनं ठरवावं – छत्रपती संभाजी राजे
- 4 दिवस 75 तासानंतर यशवंत जाधवांच्या घरावरील कारवाई थांबवली; महत्वाची माहिती समोर