मालवणी : गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष काहीसा पेटलेला दिसत आहे. दिवसेंदिवस या संघर्षाची धार वाढताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागे शिवसेनेला गोत्यात आण्यासाठी दिशा सालियन मृत्यू प्रकरण उकरून काढले होते. यावेळी त्यांच्यासोबत नितेश राणे हे देखील उपस्थित होते.
राष्ट्रवादी परिसंवाद अन् पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज!
दिशा सालियन मृत्यू हा लैंगिक अत्याचारामुळे झाला होता असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला होता. त्यानंतर नारायण राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल मागितला होता. आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार दिशा सालियन मृत्यू प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाने याबात अहवाल सादर केला आहे.
नवाब भाईंसाठी आता एमआयएम मैदानात ; खासदार इम्तियाज जलील करणार आंदोलन
राजनीती के वजह से हमको बहोत परेशान होना पडा आहे, वो लोग हमे चैन से जिने नही दे रहे है असं वक्तव्य दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी केलं आहे. त्यानंतर महिला आयोगाने नारायण राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. एवढंच नाही तर दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरा पोलीस ठाणे गाठत थेट नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दिशाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर अत्याचार झाला किंवा संशयास्पद काही झालं असं आढळून आलेलं नाही. असं असतानाही वारंवार आपल्या राजकारणासाठी तिची बदनामी नारायण राणे करत असल्याचा आरोप दिशा सालियन कुटुंबीयांनी केला आहे. राणे पिता पुत्रांवर आता गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे.
Read also:
- राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर रोहित पवारांचे ते ट्विट चर्चेत; म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकही…
- मला आता कुठपर्यंत न्यायचं हे सरकारनं ठरवावं – छत्रपती संभाजी राजे
- 4 दिवस 75 तासानंतर यशवंत जाधवांच्या घरावरील कारवाई थांबवली; महत्वाची माहिती समोर
- छत्रपती संभाजी राजेंना राज्य सरकारकडून चर्चेच निमंत्रण; मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होणार बैठक
- शिवाजी महाराज, रामदास स्वामीच्या कोणताही पुरावा नाही; राज्यपालांच्या वक्तव्यांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया