मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर पुण्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना वर धक्कादायक आरोप लावत बाप बेटे जेलमध्ये जाणार असल्याचं विधान केले. या प्रकरणात किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याचा समावेश झाला होता.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्यांवर पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांच्याशी संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर नील सोमय्यांनी यासंदर्भात कोर्टात धाव घेतली.
मराठा आरक्षणासंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्या हातात जे आहे ते करू, मात्र…
नील सोमय्या यांनी मुंबईतील न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुर्ण झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश दीपक भागवत यांच्या समोर ही सुनावणी करण्यात आली. उद्या 1 मार्च रोजी मुंबई सत्र न्यायालय यासंदर्भात निर्णय सुनावणार आहे. ज्येष्ठ वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी नील सोमय्या यांच्यासाठी युक्तिवाद केला होता.
Read also:
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यांवर इडीची कारवाई; तब्बल 13 कोटी 41 लाख मालमत्ता जप्त
- नंदुरबारमध्ये दाऊद इब्राहिमच्या पुतळ्याचे दहन करत ठाकरे सरकारचा नोंदवला निषेध
- वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती, चिरंजीवला दिल्लीची स्वप्ने; भातखळकरांची टीका
- दोन विमाने आले म्हणजे सगळे विद्यार्थी आले असं होत नाही; विजयी वडेट्टीवारांचा केंद्र सरकारला टोला
- संयम संपला: संध्याकाळ पर्यंत पत्र आलं नाही तर…; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा