नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे गैरव्यवहारांचे पुरावे सादर केले. यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात अजून मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप देखील केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यांवर इडीची कारवाई; तब्बल 13 कोटी 41 लाख मालमत्ता जप्त
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, मी पंतप्रधान कार्यालयाकडे काही कागदपत्रे पाठवली आहे. मात्र त्यावर केंद्र सरकारकडून कारवाई करतील अशी अपेक्षा नाही. कारण केंद्रातल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सुडाच्या कारवाया वाढल्या आहेत. मला असं वाटतंय की, केंद्रीय तपास यंत्रणांना देशातून सध्या महाराष्ट्रातच जास्त काम आहे.
नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी; त्या आधी समोर आली माहिती
महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करायचं. त्यांच्यावर खोटी प्रकरणं, खोटे पुरावे उभे करून त्यांच्यावर राजकीय चिखलफेक सुरू आहे. परंतु जे काही चिखलफेक करताहेत. त्यांचे हात देखील किती बरबटलेले आहेत हे सुद्धा देशाला कळायला हवं. असंही संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान कार्यालयात पुरावे सादर केल्याचा संजय राऊत यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, यामागे कोणतंही सिंडिकेट आहे, त्याबाबतची माहिती मी काल पंतप्रधान कार्यालयाकडे. सुपुर्द केली आहे. हा रेकॉर्ड आहे की आम्ही तुम्हाला कळवलं आहे, पण तुम्ही त्यावर काहीही केललं नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
Read also:
- ईडीच्या कारवाईच्या विरोधात नवाब मलिक आक्रमक; मुंबई उच्च न्यायालयात मागितली दाद
- आता जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम करायचा; खासदार विखेंचा महाविकास आघाडीला इशारा
- संजय राऊत अजून एक राजकीय बॉम्ब फोडण्याच्या तयारीत; लवकरच पत्रकार परिषद घेणार
- लक्ष नाय काय म्हणता, या माणसाला टीका करण्याखेरीज काम नाही – नारायण राणे
- मराठा समाजाच्या प्रमुख पाच मागण्या सरकार पूर्ण करणार; संभाजीराजेंच्या कोणत्या मागण्या होत्या…