मुंबई : भाजपच्या संबित पात्रांनी, ‘महामारीच्या काळात कॉंग्रेसने “टूलकिट” च्या वापरातून सरकारला घेरण्याचा, अनेक मार्गांनी देशात गोंधळाची स्थिती निर्माण करून, तिचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, राहुल गांधींनी देखील, पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला डाग लावण्यासाठी एक संधी म्हणून, नव्या विषाणूचे नाव “मोदी व्हायरस” ठेवण्याच्या सूचना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या. हा सगळं प्रकार टूलकिटचा भाग असून, काँग्रेस भाजपविरोधात टूलकिटचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, यावरूनच राज्यातील भाजपच्या नेत्यांनी देखील काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केले असून, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर एक ट्विट करून, “काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते”, असा हल्लबोल काँग्रेस पक्षावर केला आहे.
काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा कमी खतरनाक नाही.
'इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा', असे आदेश यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते. pic.twitter.com/6FYQveTYrV— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 18, 2021
तसेच, “भारताचा शत्रू नंबर 1 असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा 2008 पासून करार आहे. त्यामुळे सगळे जग जरी कोरोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत त्याची परतफेड नको?”, असे म्हणत त्यांनी काँग्रेस पक्षाचा संबंध चिनी राज्यकर्त्यांशी जोडून काँग्रेसवर टीका केली आहे.
भारताचा शत्रू नंबर 1 असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा 2008 पासून करार आहे. त्यामुळे सगळे जग जरी कोरोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार.
चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत त्याची परतफेड नको?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 18, 2021
याप्रकरणी काँग्रेसनं देखील भाजपावर पलटवार केला असून, भाजपने केलेले आरोप तद्दन आणि बिनबुडाचे असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव गौडा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
BJP is propagating a fake "toolkit" on “COVID-19 mismanagement” & attributing it to AICC Research Department. We are filing an FIR for forgery against @jpnadda & @sambitswaraj
When our country is devastated by COVID, instead of providing relief, BJP shamelessly concocts forgeries— Rajeev Gowda (@rajeevgowda) May 18, 2021
जगात कुठलीही आंदोलनं करताना त्याचा एक कृती कार्यक्रम किंवा आराखडा तयार केला जातो. हा आराखडा आंदोलन पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी तसेच, आंदोलनाचे स्वरूप तीव्र करण्यासाठीच्या उद्देशानं तयार केलेला असतो. याला साधारणपणे “टूलकिट” संबोधले जाते.
Read Also :
- शेतकऱ्यांवर लादलेली खतांची दरवाढ, केंद्र सरकारने मागे घ्यावी; शरद पवारांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र
- ‘मोदींची प्रतिमा वाचवण्यासाठी तरी तकलादू व्हेंटीलेटर्स चालू करून दाखवा’
- रक्षा खडसेंचा मोदी सरकारला घरचा आहेर.! म्हणाल्या खताच्या किंमती…
- तौक्ते आणि यूपीएससीवरून, भाई जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक चकमक
- “भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”