मुंबई : महामारीच्या आकस्मिक संकटाने आधीच शेतकरी राजाचे कंबरडे मोडले असताना, आता मोदी सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ केली असून, शेतकरी मोठ्या मुश्किलीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने वाढवलेले रासायनिक खतांचे दर कमी करावेत अशी मागणी करणारे पत्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना लिहिले आहे.
But I have learnt that instead of extending helping hand to this distressed community, the Central Government has taken decision to increase the prices of #fertilizers exponentially. #COVID19 @DVSadanandGowda @PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2021
महामारीने देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. याचा परिणाम समाजातील छोट्या मोठ्या घटकांवर झाला आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालालाही देशातल्या अशा परिस्थितीमुळे उठाव नसल्याने तोही अडचणीत आहे. यातच सरकारने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. हे वाढवलेले खतांचे दर सरकारने कमी करावेत. एकीकडॆ इंधन दरवाढीचा चटका आणि आता खतवाढीच्या झटक्याने, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण वैयक्तिकरित्या लक्ष घालावे आणि किंमतीतील दर वाढ लवकर मागे घ्यावी, अशी विनंती पवार यांनी केली आहे.
The consequent lockdown conditions have already crumbled the marketing system. As the Monsoon is right at the doorsteps, the unfortunate decision would directly hamper the pre-sowing agricultural activities and in future affect the production cost and productivity of the crops.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2021
इफको 10:26:26 चा आधीचा दर ११७५ रुपये इतका होता, तो आता वाढून १७७५ रुपये झाला आहे. इफको 10:32:16 चा जुना दर ११९० होता, तो आता १८०० रुपये इतका झाला आहे. इफको 20:20:00 चा जुना दर हा ९७५ रुपये होता, तो आता वाढून १३५० रुपये इतका झाला आहे, तर डीएपी खताचा जुना दर जो १८७५ रुपये इतका होता, तो आता १९०० रुपये इतका झाला आहे.
With inflated rates of fuel, the new decision will rub salt in the wounds of the farmers. The decision is shocking and needs to be reviewed immediately.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2021
आयपीएल डीएपी खताची जुनी किंमत जी १२०० रुपये होती, ती आता वाढून १९०० रुपये इतकी झाली आहे. आयपीएल 20:20:00 ची जुनी किंमत ही ९७५ रुपये इतकी होती, ती आता १२०० रुपये इतकी झाली आहे. तसेच, पोटॅशच्या एका पोत्याची किंमत आधी ८५० रुपये होती, ती आता १००० रुपये करण्यात आली आहे.
Hence, I would like to request Hon’ble Minister of Chemicals & Fertilizers Shri D. V. Sadananda Gowda ji to personally look into the matter and roll back the price rise at the earliest.@DVSadanandGowda @PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2021
On the backdrop of #COVID19 Pandemic situation, I would highly appreciate if more relief will be given to the farmers community.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2021
Read Also :
- ‘मोदींची प्रतिमा वाचवण्यासाठी तरी तकलादू व्हेंटीलेटर्स चालू करून दाखवा’
- रक्षा खडसेंचा मोदी सरकारला घरचा आहेर.! म्हणाल्या खताच्या किंमती…
- तौक्ते आणि यूपीएससीवरून, भाई जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक चकमक
- “भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे गरजेचं”
- “नुसता फोन फिरवला तरी शंभर वेळा हजर होईन” म्हणणारे प्रताप सरनाईक गायब!