मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना भाजपचा पाठिंबा असल्याचे दिसते आहे. कारण त्यांचे गैरकृत्य उघडपणे समोर येत असतानाही भाजप त्यांना फटकारत नाही. राजकीय नेत्यांचे राजीनामे सतत मागून घेण्याची सवय असलेल्या भाजप आता सत्तार यांचा राजीनामा का मागत नाही. असा सवाल राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी केला आहे.
“तरूणाला शिव्या देत जबरदस्त मारहाण, शिंदे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत”
सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी अपमानास्पद आणि बेताल वक्तव्ये केली. तेव्हाही भाजप नेते गप्प बसले होते. आता दोन प्रमुख मुद्दे समोर आले आहेत. ज्यात अब्दुल सत्तार यांचा सहभाग आहे. पण त्यांच्या या गैरकृत्यांवर भाजप दुर्लक्ष करत आहे. प्रथम वाशिममधील ३७ एकर ‘गायरान’ जमिनीचा मुद्दा, जी त्यांनी एका खाजगी व्यक्तीच्या नावे नियमित केली आणि दुसरे म्हणजे त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या मतदारसंघातील, सिल्लोडमधील कृषी समारंभासाठी निधी जमा करण्यास सांगितले. असंही ते म्हणाले.
“तसं सत्ताधाऱ्यांचं झालंय”, अन् रोहित पवारांनी तो व्हिडिओ ट्विट करत साधला निशाणा
पुढे बोलतांना ते म्हणाले की, प्रश्नांची उत्तरे देणे टाळण्यासाठी अब्दुल सत्तार काल नागपूर विधानसभेपासून दूर राहिले आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यांवर सौम्य भूमिका घेत सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाची तपासणी करेल आणि नंतर आवश्यक ती कारवाई करेल असे सांगताना दिसले. सत्तार यांचे एका महिलेविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य असो किंवा सरकारी अधिकाऱ्याला त्यांनी चहा नाही तर दारू पिता का असे विचारणे असो वा आता ताज्या मुद्द्यांवर भाजपने त्यांना कधीही काही न बोलणे व न फटकारणे असो… त्यामुळे अब्दुल सत्तार उद्दाम आणि बेताल झाले आहेत. हे सर्व लक्षात घेतल्यानंतर त्यांना भाजपचा पाठिंबा असल्याचे संकेत मिळतात. असंही ते म्हणाले. तसेच हे खरे असू शकते. कारण भाजप सत्तेत राहण्यास इच्छुक असल्यामुळे ते सत्तार यांना फटकारतील अशी शक्यता नाही. भाजप नेत्यांना माहीत आहे की, सत्तार यांना फटकारल्याने त्यांनाच त्रास होईल. असंही ते म्हणाले.
“अब्दुल सत्तार यांना फटकारल्याने आपल्यालाच त्रास होईल हे भाजपला माहीत आहे”#AbdulSattar #BJP#NagpurWinterSession pic.twitter.com/qi7jxnFXBe
— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) December 27, 2022
Read also
- “गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला”; विरोधकांचा विधानभवनाच्या परिसरात भजनी आंदोलन
- “नाममात्र विरोध करणारा सच्चा विरोधी पक्ष नेता अजित दादांच्या रूपात पहिल्यांदाच महाराष्ट्राने पाहिला”
- अन्यथा पुणे महापालिका जिंकणे भाजपला अवघड जाईल..! भाजप नेत्यांचं सुचक विधान
- रूपाली पाटील आमदार होण्याच्या वाटेवर, कसबा मतदार संघातून पोटनिवडणुक लढवणार?
- विधानभवनावर ‘आप’चा धडक महामोर्चा, विविध मागण्यांसाठी दिले निवेदन