पुणे : दोन दिवसापुर्वी भाजपच्या कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं आहे. महापालिका विरोधी पक्षनेत्या, महापौर आणि 2019 मध्ये भाजपच्या आमदार असा मुक्ता टिळक यांचा प्रवास राहिलेला. त्यांच्या निधनानंतर आता याठिकाणी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. यासाठी आता पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील निवडणुक लढविण्यास आग्रही आहेत.
“खंड न पडता खाता श्रीखंड, सांगा एकनाथराव…यासाठीच केला होता का बंड”; राष्ट्रवादीने डिवचलं
रूपाली पाटील ठोंबरे यांनी आपण कसब्यातून निवडणुक लढण्यास इच्छूक असल्याचं सांगितलं आहे. मुक्ताताई यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणुक लागणार आहे. ती पक्षाने आदेश दिला तर मी लढणार आहे. 2019 ची विधानसभा निवडणुक झाली तेव्हापासून मुक्ता टिळक आजारी होत्या.
“भाजपचं शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न,एकनाथ भाऊंना कधी समजणार?” सुषमा अंधारे
या आजारपणात देखील मुक्ता टिळक यांना जेवढं शक्य होतं तेवढं काम त्यांनी केलं आहे. आता पोटनिवडणुकीत झालीच तर मतदार ठरवतील नक्की कुणाला निवडून द्यायचं? पण पक्षाने आदेश दिला तर मी नक्की निवडणुकीच्या रिंगणात उतरेन, असं रूपाली पाटील यांनी सांगितलं आहे.
“आदित्य ठाकरे सोन्यासारखा मूलगा, त्यांना बदनाम करणाचे विरोधकांचे प्रयत्न”
दरम्यान, मनसेच्या अतंर्गत राजकारणाला कंटाळून रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यानंतर सुरूवातीला त्यांची पक्षाने महिला प्रवक्त्या म्हणून नेमणुक केली. त्यातच लगेचच त्यांना पुणे शहाराच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता कसबा मतदार संघात जर पोटनिवडणूक झाली तर राष्ट्रवादी त्याठिकाणी रूपाली पाटील यांना तिकीट देण्याची शक्यता आहे.
Read also
- विधानभवनावर ‘आप’चा धडक महामोर्चा, विविध मागण्यांसाठी दिले निवेदन
- “तरूणाला शिव्या देत जबरदस्त मारहाण, शिंदे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत”
- “तसं सत्ताधाऱ्यांचं झालंय”, अन् रोहित पवारांनी तो व्हिडिओ ट्विट करत साधला निशाणा
- “तर कृषीमंत्र्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा”
- सोमय्यांकडून शरद पवारांचं कौतुक, म्हणाले, “मी त्यांच्याकडून एक गुण घेतलाय, तुम्हीही घ्या”