मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी भुंखडचा विषय लावून धरला आहे. तत्कालीन मंत्री असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 84 कोटीचा भुखंड हा 2 कोटी रूपयांना बिल्डरांना विकल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात लावून धरली आहे. यावरून राष्ट्रवादीचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर कडाडून टिका केेली आहे.
संजय राऊतांनी ट्विट केला सुतळी बॉम्बचा फोटो, विरोधक धाकधुकीत
भुखंड घ्या, कुणी श्रीखंड घ्या, गायरान घ्या, कुणी भुखंड घ्या, भुखंडावर श्रीखंड खाणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्या. अशा घोषणा सध्या विधानभवनाच्या परिसरात बघायला मिळत आहेत. यातच न पडता खंड रोज खातायत भूखंडाचे श्रीखंड, सांगा एकनाथ राव यासाठीच केला होता का बंड, सीमा प्रश्नी मात्र होता थंड, असं म्हणत सुरज चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना घेतलं धारेवर, थेट राजीनाम्याची मागणी”
दरम्यान, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात देखील भुखंडाचा विषय विरोधकांनी लावून धरला. यावेळी सभागृहात मोठा राडा बघायला मिळाला. यात दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज काहीच तास झालं आहे. यातच राज्यातील महत्वांच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधक कधी बोलणार ? असा प्रश्न देखील यानिमित्ताने सर्वसामान्यांना पडला आहे.
न पडता खंड
रोज खातायत
भूखंडाचे श्रीखंड
सांगा एकनाथ राव
यासाठीच केला होता का बंड
सीमा प्रश्नी मात्र होता थंड.— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) December 26, 2022
Read also
- “भाजपचं शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न,एकनाथ भाऊंना कधी समजणार?” सुषमा अंधारे
- “आदित्य ठाकरे सोन्यासारखा मूलगा, त्यांना बदनाम करणाचे विरोधकांचे प्रयत्न”
- “नारायण राणेंचं कर्तृत्व शुन्य, त्यांना कवडीचीही किमंत कुणी देत नाही”
- बाळासाहेब थोरातांना भोवळ, हाताला, खांद्याला दुखापत, मुंबईत आणणार..
- “महाराष्ट्रातील सर्वात मोठा गद्दार, अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार…” अन् परिसर दणाणला