नागपूर : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातील सिल्लोड महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या महोत्सवातून कोट्यावधीचा भ्रष्टाचार करण्यात येत असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी आक्रमक मागमी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. एक दोन दिवसापासून सिल्लोड कृषी महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याचे पडसाद आज विधानसभेत देखील बघायला मिळाले आहेत.
“तुम्ही समजता तसे मोदी नाही, ते हिंदुत्ववादीही नाहीत;” मोदींना भाजपचाच घरचा आहेर
औरंगाबाद येथील सिल्लोड येथे 1 ते 10 जानेवारी दरम्यान सिल्लोड महोत्सव आयोजन केला जात आहे. यासाठी या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांचे फोटो आहेत. मात्र येथील कृषी अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. कृषी मंत्रालयाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी कृषी प्रदर्शनासाठी पावती पुस्तके खपविण्याचे काम कृषी आयुक्तालयाच्या गळ्यात मारले असून यामधून कोट्यावधी रूपयाचा भ्रष्टाचार होणार असल्याची बाब अजित पवारांनी सभागृहात मांडली आहे.
“अजित दादा..! तुम्ही वेळ चुकली, तो शपथविधी दुपारी झाला असता तर…”; अन् भाजपच्या आमदारांनी
कृषी आयुक्तालयाने यासाठी पावत्या तयार केल्या असून प्लॅटिनय पावती 25 हजार, डायमंड पावती 5 हजार, गोल्ड पावती 10 हजार अन् सिल्व्हर पावती 5 हजार रूपालयाच्या ठेवल्या आहेत. या पावत्या कृषी आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पाठवल्या असून त्या द्वारे पैसे गोळा करून कार्यालयांमध्ये जमा करण्याच्या तोंडी सुचना देण्यात आल्या आहेत. यावरून अजित पवारांनी अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पवार साहेबांचा तुम्हाला फोन आला होता का? अन् अजित पवार भडकले, नाराजीवरील चर्चा फेटाळली
दरम्यान, या प्रकरणी अजित पवारांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचे चित्रण देखील दाखवले आहेत. तसेच यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.
Read also
- “…तो पर्यंत सीमाभाग हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची सभागृहात मागणी
- “राष्ट्रवादीत घुसमट होत असून अजित दादा आमच्यासोबत आल्यास आनंद”
- राजकारण तापणार..! ठाकरे पहिल्यांदाच सभागृहात अन् विरोधकांवर ‘पेन ड्राईव्ह वार’
- आजचा दिवसही वादळी ठरणार…! सत्ताधारी अन् विरोधक विधानभवनाऱ्यांच्या पायऱ्यांवरच आमनेसामने
- “विधान भवन परिसरात शाईच्या पेनाला बंदी मात्र ‘सिगारेट’ ओढायला खुली परवानगी”?