नागपूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद यावरून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू झाली आहे. आज विशेष:त राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या सभागृहात दाखल झाले असून त्यांनी सुरूवातीला सत्ताधारी पक्षाला घेरण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात एक पेन ड्राईव्ह देखील दिला आहे.
“लोकशाहीमध्ये संस्कृती कशी जपावी हे अजित पवारांकडून शिकावं” उदय सामंत
सीमावादाच्या प्रश्नांवरून कर्नाटक सरकारने त्यांच्या विधान परिषदेत ठराव मंजूर करून घेण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेत असा कोणताही ठराव अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. त्यावरून आज सुरूवातीलाच ठाकरे यांनी महाराष्ट्र सीमावाद प्रश्नावर भाष्य करत एक पेन ड्राईव्ह देखील दिला आहे.
“मंत्रीपदासाठी लोक हजारो, कोटी देण्यास तयार असतात पण…;” संजय गायकवाड यांचं मोठ वक्तव्य
सीमाभागातील लोकांना महाराष्ट्रात यायचं आहे. सीमावादाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत असल्याची चांगली गोष्ट आहे. याच प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारने या विषयाबाबत एक चित्रपट बनावलं होतं. केस फॉर जस्टीस असं या चित्रपटाचा विषय होता. बेळगाव, कारवार, निपाणी येथील लोकं 1857 पासून त्याठिकाणी मराठी पाट्या वापरत आहेत. तेथील लोकांनी कशा पद्धतीने मराठीचा वापर केला आहे. आणि हा ठराव आपण का आणत आहेत असंही यामध्ये दाखवण्यात आलं आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- आजचा दिवसही वादळी ठरणार…! सत्ताधारी अन् विरोधक विधानभवनाऱ्यांच्या पायऱ्यांवरच आमनेसामने
- “विधान भवन परिसरात शाईच्या पेनाला बंदी मात्र ‘सिगारेट’ ओढायला खुली परवानगी”?
- “तुम्ही समजता तसे मोदी नाही, ते हिंदुत्ववादीही नाहीत;” मोदींना भाजपचाच घरचा आहेर
- “अजित दादा..! तुम्ही वेळ चुकली, तो शपथविधी दुपारी झाला असता तर…”; अन् भाजपच्या आमदारांनी
- पवार साहेबांचा तुम्हाला फोन आला होता का? अन् अजित पवार भडकले, नाराजीवरील चर्चा फेटाळली