नागपूर : राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशनाची सुरूवात वादळी झाली आहे. मागच्या एक आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामुळे विधिमंडळाचं कामकाज काहीच तास चालललं. यातच आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा सातवा दिवस आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
जंयत पाटलांचं निलंबण..! पुतणे अजित पवार यांच्यावर काका शरद पवार नाराज?
महापुरूषांचा अपमान केल्याने मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाई फेक करण्यात आली होती. त्याची खबरदारी म्हणून विधीमंडळाच्या परिसरात शाई पेन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यातच विधिमंडळाच्या परिसरात एक व्यक्ती सिगारेट ओढात असतांनाचा व्हिडीओ अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्य सरकारला सवाल केला आहे. विधान भवन परिसरात शाईच्या पेनाला बंदी मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
“तर फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरही राहणार नाहीत”; फडणवीसांना भाजपचाच आहेर
अलिकडेच त्यांनी विधान परिसरातील आमदार निवासमधील टॉयलेट मध्ये आमदारांना दिल्या जाणाऱ्या चहा कपबशा धुतानांचा व्हिडीओ मिटकरी यांनी पोस्ट केला होता. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात हा विषय मांडून संबंधित कंत्राट दारावर प्रश्न उपस्थित केले होते.
“A फॉर अमित शाह सुद्धा होतं,” विकृतीचं नाव ठेवणाऱ्या राणेंना जोरदार प्रत्युत्तर
यातच अमोल मिटकरी यांनी अजून एक व्हिडीओ ट्विट करत सरकारला कोंडीत पकडलं होतं. नागपुर विधीमंडळ परिसरातील ज्युस सेंटर परिसरातील धक्कादायक प्रकार समोल आणला होता. शौचालयाच्या प्रवेशद्वारावर ज्युस सेंटरची फळं स्वच्छ केली जात होती. यावरून हिवाळी अधिवेशनात अनेक आमदार आणि अधिकारी या सेंटरवरून ज्युस घेतात. शौचालयाच्या बाहेर संत्र्यांची साल काढली जाते आणि इतर फळं स्वच्छ केली जातात. असं मिटकरींनी ट्विट करत राज्य सरकारवर टिका केली होती.
Read also
- “तुम्ही समजता तसे मोदी नाही, ते हिंदुत्ववादीही नाहीत;” मोदींना भाजपचाच घरचा आहेर
- “अजित दादा..! तुम्ही वेळ चुकली, तो शपथविधी दुपारी झाला असता तर…”; अन् भाजपच्या आमदारांनी
- पवार साहेबांचा तुम्हाला फोन आला होता का? अन् अजित पवार भडकले, नाराजीवरील चर्चा फेटाळली
- “लोकशाहीमध्ये संस्कृती कशी जपावी हे अजित पवारांकडून शिकावं” उदय सामंत
- “मंत्रीपदासाठी लोक हजारो, कोटी देण्यास तयार असतात पण…;” संजय गायकवाड यांचं मोठ वक्तव्य