नागपूर : राज्याचं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून सत्ताधारी आणि विरोधक कामकाज सुरू होण्याच्या अगोदरच आमनेसामने आले आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यावरच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे आजच्या अधिवेशन देखील वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“मंत्रीपदासाठी लोक हजारो, कोटी देण्यास तयार असतात पण…;” संजय गायकवाड यांचं मोठ वक्तव्य
शिंदे गटाचे लोकसभेचे नेते आणि खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर धक्कादायक आरोप केलेत. त्यानंतर राहुल शेवाळे यांच्याविरोधात शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एका बलात्कार प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली.
जंयत पाटलांचं निलंबण..! पुतणे अजित पवार यांच्यावर काका शरद पवार नाराज?
या प्रकरणी राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. यावरून संबंधित महिला ही दाऊदशी संबंधित असून तिने विनाकारण राहुल शेवाळे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावरून दाऊदशी संबंधित महिलेले पाठिशी घालणाऱ्या युवा सेनेच्या नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे. यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी दिली आहे.
“तर फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरही राहणार नाहीत”; फडणवीसांना भाजपचाच आहेर
तर दुसरीकडे नागपूर येथील एनआयटी सन्यास भुखंडावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. यावरून पन्नास खोक्के एकदम ओक्के अशी घोषणा देत मुख्यमंत्र्यांनी या प्रकऱणी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील विरोधकांनी यावेळी विधान सभेच्या पायऱ्यांवरच केली. तसेच सीमावादावर ठराव मांडण्यात यावा. अशी मागणी देखील विरोधकांनी लावून धरली आहे.
Read also
- “विधान भवन परिसरात शाईच्या पेनाला बंदी मात्र ‘सिगारेट’ ओढायला खुली परवानगी”?
- “तुम्ही समजता तसे मोदी नाही, ते हिंदुत्ववादीही नाहीत;” मोदींना भाजपचाच घरचा आहेर
- “अजित दादा..! तुम्ही वेळ चुकली, तो शपथविधी दुपारी झाला असता तर…”; अन् भाजपच्या आमदारांनी
- पवार साहेबांचा तुम्हाला फोन आला होता का? अन् अजित पवार भडकले, नाराजीवरील चर्चा फेटाळली
- “लोकशाहीमध्ये संस्कृती कशी जपावी हे अजित पवारांकडून शिकावं” उदय सामंत