मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करत बंड पुकारला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार देखील राष्ट्रवादीच नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल एक विधान केल्याने राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे.
पवार साहेबांचा तुम्हाला फोन आला होता का? अन् अजित पवार भडकले, नाराजीवरील चर्चा फेटाळली
अजित पवारांची राष्ट्रवादीत घुसमट होत असून हे आमच्यासोबत आल्यास आम्हाला आनंदच होईल. असं दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार यावर आता काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अलिकडेच भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी देखील या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं.
“लोकशाहीमध्ये संस्कृती कशी जपावी हे अजित पवारांकडून शिकावं” उदय सामंत
एका कार्यक्रमात भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी शनिवारी अजित पवारांबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलतांना दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. दादा तुमची वेळ थोडी चुकली, सकाळ ऐवजी दुपारी झालं असतं तर तुम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता, असं प्रवीण पोटे यांनी म्हटले होते.
Read also
- राजकारण तापणार..! ठाकरे पहिल्यांदाच सभागृहात अन् विरोधकांवर ‘पेन ड्राईव्ह वार’
- आजचा दिवसही वादळी ठरणार…! सत्ताधारी अन् विरोधक विधानभवनाऱ्यांच्या पायऱ्यांवरच आमनेसामने
- “विधान भवन परिसरात शाईच्या पेनाला बंदी मात्र ‘सिगारेट’ ओढायला खुली परवानगी”?
- “तुम्ही समजता तसे मोदी नाही, ते हिंदुत्ववादीही नाहीत;” मोदींना भाजपचाच घरचा आहेर
- “अजित दादा..! तुम्ही वेळ चुकली, तो शपथविधी दुपारी झाला असता तर…”; अन् भाजपच्या आमदारांनी