नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचं आज दुसरा आठवडा असून यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यावेळी गायरान जमीनी आणि सिल्लोड कृषी महोत्सावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार विरोधकांचे लक्ष्य बनले. यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. त्याआधी काॅंग्रेसचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांना भोवळ आल्याने त्यांच्यावर नागपूर येथील दावाखान्यात उपचार सुरू आहेत.
राजकारण तापणार..! ठाकरे पहिल्यांदाच सभागृहात अन् विरोधकांवर ‘पेन ड्राईव्ह वार’
विधानभवनाच्या परिसरात सकाळी मॉर्निंग वाक करताना त्यांना भोवळ आल्याने ते जमीनीवर पडले. यावेळी त्यांच्या खांद्याला, हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर लगचेच त्यांना नागपूर येथील रूग्णालयात नेण्यात आले. त्यातच आता त्यांना विशेष विमानाने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत नेण्यात येणार आहे.
आजचा दिवसही वादळी ठरणार…! सत्ताधारी अन् विरोधक विधानभवनाऱ्यांच्या पायऱ्यांवरच आमनेसामने
त्यांनी यासंदर्भात एक ट्विट देखील केलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पुर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॉमिली डॉक्टराच्या सल्ल्याने मुंबईत घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “महाराष्ट्रातील सर्वात मोठा गद्दार, अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार…” अन् परिसर दणाणला
- संजय राऊतांनी ट्विट केला सुतळी बॉम्बचा फोटो, विरोधक धाकधुकीत
- “अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना घेतलं धारेवर, थेट राजीनाम्याची मागणी”
- “…तो पर्यंत सीमाभाग हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची सभागृहात मागणी
- “राष्ट्रवादीत घुसमट होत असून अजित दादा आमच्यासोबत आल्यास आनंद”