नागपूर : राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहेत. विरोधकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून सरकारला घेरल्यानंतर आज विधानसभेत सीमावादाच्या संदर्भात ठराव मांडण्याची शक्यता आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी आज ठाकरे सेना नागपुरात दाखल झाली असून उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आज विधान परिषदेच्या सभागृहाच्या चर्चेत सहभाग घेतला.
“विधान भवन परिसरात शाईच्या पेनाला बंदी मात्र ‘सिगारेट’ ओढायला खुली परवानगी”?
नागपुर येथील भुखंड या प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विरोधक आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत नागपुरात दाखल झाले आहेत.
“तुम्ही समजता तसे मोदी नाही, ते हिंदुत्ववादीही नाहीत;” मोदींना भाजपचाच घरचा आहेर
नागपुरात दाखल होण्याच्या अगोदर संजय राऊत अन् ठाकरे यांनी मोठा बॉम्ब फोडणार असल्याचं वक्तव्य केलंय. त्याआधी त्यांनी एक उदबतीसोबत सुतळी बॉम्बचा फोटो ट्विट करत शिंदेंना इशारा दिला आहे. त्यामुळे आज संजय राऊत काय मोठा गौप्स्फोट करणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
“अजित दादा..! तुम्ही वेळ चुकली, तो शपथविधी दुपारी झाला असता तर…”; अन् भाजपच्या आमदारांनी
दरम्यान, आज विधानभवनाच्या परिसरात दाखल झाल्यानंतर प्रसार माध्यामांनी ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु विधान परिषदेच्या कामकाजानंतर संवाद साधणार असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्यासोबत संजय राऊत देखील उपस्थित होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे अन् संजय राऊत काय बोलणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जय महाराष्ट्र!
शुभ प्रभात pic.twitter.com/ugyt0vctys— Sanjay Raut (@rautsanjay61) December 26, 2022
Read also
- “अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना घेतलं धारेवर, थेट राजीनाम्याची मागणी”
- “…तो पर्यंत सीमाभाग हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची सभागृहात मागणी
- “राष्ट्रवादीत घुसमट होत असून अजित दादा आमच्यासोबत आल्यास आनंद”
- राजकारण तापणार..! ठाकरे पहिल्यांदाच सभागृहात अन् विरोधकांवर ‘पेन ड्राईव्ह वार’
- आजचा दिवसही वादळी ठरणार…! सत्ताधारी अन् विरोधक विधानभवनाऱ्यांच्या पायऱ्यांवरच आमनेसामने