नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात गायरान जमीनी आणि सिल्लोड कृषी महोत्सवाचा मुद्दा चांगलाचं गाजला. वाशिम जिल्ह्यातील गायरानासाठी आरक्षित असलेल्या 37 एकर जमीन नियमित करण्याच्या आदेशावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्तार यांना नोटीस पाठवली आहे. तर सिल्लोड महोत्सवासाठी कोट्यावधी रूपये जमा करण्याचे आदेश त्यांनी एका बैठकीत दिले आहेत.
आजचा दिवसही वादळी ठरणार…! सत्ताधारी अन् विरोधक विधानभवनाऱ्यांच्या पायऱ्यांवरच आमनेसामने
अब्दुल सत्तार यांचा मुद्दा विधानसभेत आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मांडला. यावेळी अजित पवार चांगलेच आक्रमक दिसले. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सभागृहात केली. सभागृह तहकुब केल्यानंतर विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली.
“विधान भवन परिसरात शाईच्या पेनाला बंदी मात्र ‘सिगारेट’ ओढायला खुली परवानगी”?
सभागृहातील कामकाज सुरू असतांनाही विरोधकांनी सभागृहात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी दिली. तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरच महाराष्ट्रातील सर्वात मोठा गद्दार, अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार अशा घोषणा देखील विधानभवनातील परिसर दणादणून सोडला.
“तुम्ही समजता तसे मोदी नाही, ते हिंदुत्ववादीही नाहीत;” मोदींना भाजपचाच घरचा आहेर
दरम्यान, औरंगाबाद येथील सिल्लोड येथे 1 ते 10 जानेवारी दरम्यान सिल्लोड महोत्सव आयोजन केला जात आहे. यासाठी या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांचे फोटो आहेत. मात्र येथील कृषी अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. कृषी मंत्रालयाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी कृषी प्रदर्शनासाठी पावती पुस्तके खपविण्याचे काम कृषी आयुक्तालयाच्या गळ्यात मारले असून यामधून कोट्यावधी रूपयाचा भ्रष्टाचार होणार असल्याची बाब अजित पवारांनी सभागृहात मांडली आहे.
Read also
- संजय राऊतांनी ट्विट केला सुतळी बॉम्बचा फोटो, विरोधक धाकधुकीत
- “अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना घेतलं धारेवर, थेट राजीनाम्याची मागणी”
- “…तो पर्यंत सीमाभाग हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची सभागृहात मागणी
- “राष्ट्रवादीत घुसमट होत असून अजित दादा आमच्यासोबत आल्यास आनंद”
- राजकारण तापणार..! ठाकरे पहिल्यांदाच सभागृहात अन् विरोधकांवर ‘पेन ड्राईव्ह वार’